Apple Company : अॅपलवर लाखो आयफोनमध्ये खराब बॅटरी टाकल्याचा आरोप आहे. तसेच सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ही कमतरता लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच याबाबत अॅपल यूजर्सना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अॅपलच्या या हुशारीसाठी अॅपलवर 2 बिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 163 अब्ज रुपयांचा खटला दाखल करण्यात आला आहे.
ऍपलने आपली चूक मान्य केली
ऍपलने कबूल केले की iPhone 6s मॉडेलच्या काही युनिट्समध्ये बॅटरीची समस्या होती. कंपनीने याबाबत तातडीने पावले उचलून वेळेत समस्या सोडवली. बहुतेक स्मार्टफोनमध्ये अशी समस्या नव्हती. अशा परिस्थितीत सर्व स्मार्टफोन्सवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, जे पूर्णपणे निराधार आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांना आयफोनमधील खराब बॅटरीची चिंता करण्याची गरज नाही.
खटला कोणी दाखल केला
हा खटला युनायटेड किंगडममधील आहे. ग्राहक जस्टिन गुटमन यांनी खटला दाखल केला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, युनायटेड किंगडममध्ये अॅपलवर 1.6 अब्ज पौंडांचा खटला दाखल करण्यात आला आहे. या रकमेत व्याजाचाही समावेश आहे.
ऍपलने आयफोनमधील बॅटरीमधील दोष झाकून टाकला आणि युजरला न कळवता पॉवर मॅनेजमेंट टूल बसवून तो दुरुस्त केल्याचा आरोप या खटल्यात करण्यात आला आहे. iOS 15.4 लॉन्च झाल्यानंतर लवकरच बॅटरी संपण्याच्या तक्रारी आल्या होत्या. काही युजर्सनी सांगितले की नवीन अपडेटनंतर फोनची बॅटरी लवकर संपत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.