iPhone SE3 : आज लाँच होणार सर्वात स्वस्त iPhone; वाचा डिटेल्स

apple event 2022 8 march iPhone se 3 5g iPad air 5 and know everything about what to expect here
apple event 2022 8 march iPhone se 3 5g iPad air 5 and know everything about what to expect here
Updated on

Apple Event 2022 : Apple चा सामान्यांच्या खिशाल परवडणारा iPhone SE3 आज लॉन्च होऊ शकतो. या फोनची ग्राहक खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत, कारण हा फोन 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज असलेला Apple चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असणार आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणाना आयफोनचे टॉप मॉडेल्स खरेदी करणे शक्य होत नाही. ते प्रत्येकाच्या बजेटमध्ये बसतील असे नसते त्यामुळे हे आयफोन मॉडेल अनेकांसाठी सुवर्णसंधी आहे. एवढेच नाही तर कंपनीने यामध्ये दमदार फीचर्स दिले आहेत, ज्यामुळे हा स्मार्टफोन तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरु शकतो. (iPhone SE3 launch in apple Event)

Apple चा आज म्हणजेच 8 मार्च रोजी एक मेगा इव्हेंट होणार आहे. हा इव्हेंट Apple चा 2022 मधील पहिला इव्हेंट असणार आहे. यामध्ये तुम्हाला नवीन MacBook Pro, MacBook Air, Mac mini आणि iMac Pro लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. असे म्हटले जात आहे की, Apple ही सर्व उत्पादने आपल्या Apple M1 आणि M2 सिलिकॉन चिपसेटसह देऊ शकते. या इव्हेंटमध्ये सर्वांच्या नजरा iPhone SE 3 वर खिळल्या आहेत, जो Apple चा सर्वात स्वस्त iPhone असेल असे बोलले जात आहे.

इव्हेंट कुठे पाहता येईल? (How to Watch Apple Event 2022)

Apple चा हा कार्यक्रम 8 मार्च रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 11:30 वाजता आयोजित केला जाईल. कंपनीच्या यूट्यूब चॅनलशिवाय हा कार्यक्रम Apple टीव्हीवर लाईव्ह पाहता येणार आहे. Apple ने या इव्हेंटमध्ये लॉन्च होणार्‍या उत्पादनाविषयी माहिती शेअर केलेली नाही पण Peek Performance टॅगलाइन नक्कीच वापरली आहे. इव्हेंटच्या टीझरमध्ये मल्टीकलरचा वापर करण्यात आला आहे, म्हणजेच यावेळी पुन्हा आयफोन नव्या रंगात सादर होण्याची शक्यता आहे.

apple event 2022 8 march iPhone se 3 5g iPad air 5 and know everything about what to expect here
फ्लिपकार्ट लवकरच घेऊन येतंय बंपर सेल; मिळणार 80% पर्यंत सूट!

काय अपेक्षित आहे?

Apple ने या इव्हेंटमध्ये लॉन्च होणार्‍या प्रोडक्टबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही, पण रिपोर्टनुसार, इव्हेंटमध्ये नवीन मॅकबुक सादर केले जाऊ शकते. तसेच असे सांगितले जात आहे की, इव्हेंटमध्ये लॉन्च होणाऱ्या मॅकबुकमध्ये M2, M1 Pro, M1 Max चिपसेट सपोर्ट केला जाऊ शकतो. नवीन MacBook Pro, MacBook Air आणि Mac mini M2 सह ऑफर केले जाऊ शकतात, तर नवीन iMac Pro M1 Pro आणि M1 Max चिपसेटसह ऑफर केले जाऊ शकतात.

apple event 2022 8 march iPhone se 3 5g iPad air 5 and know everything about what to expect here
भारतीय लष्करात नाकारलं; तमिळनाडूतील २१ वर्षाचा इंजिनीअर लढतोय युक्रेनकडून

MacBook Air ची नवीन आवृत्ती देखील येण्याची अपेक्षा आहे. MacBook व्यतिरिक्त, iPhone SE 3 या इव्हेंटमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो जो iPhone SE 2 ची अपग्रेडेड आवृत्ती असेल. नवीन फोनमध्ये 5G सपोर्ट उपलब्ध असेल. याशिवाय यामध्ये A15 बायोनिक चिपसेट मिळू शकतो. नवीन फोनमध्ये चांगला कॅमेराही दिला जाण्याची शक्यता आहे. iPhone SE 3 ची किंमत $300 म्हणजेच जवळपास 22,700 रुपये असू शकते.

apple event 2022 8 march iPhone se 3 5g iPad air 5 and know everything about what to expect here
निवडणूक संपली, आता पेट्रोल-डिझेलचे भाव १५ रुपये वाढणार; तज्ञांचे मत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()