आयफोन 15 प्रो या मॉडेलची किंमत अमेरिकेत 999 डॉलर्स एवढी असणार आहे. तर आयफोन प्रो मॅक्सच्या 256GB व्हेरियंटची किंमत 1,199 डॉलर्स एवढी असणार आहे.
आयफोन 15 प्रो या फोनमध्ये 6.1 इंच स्क्रीन देण्यात आलेली आहे. तर प्रो प्लस या मॉडेलमध्ये 6.7 इंच स्क्रीन मिळेल. हे दोन्ही फोन गेमिंगसाठी अगदी आयडियल असणार आहेत.
iPhone 15 प्रो मॉडेलमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळणार आहे. यामध्ये नवीन A17 Pro चिप असणार आहे. या दोन्ही मॉडेल्समध्ये देखील यूएसबी-सी टाईप केबल वापरता येणार आहे. यामध्ये म्युट बटणाच्या जागी नवीन अॅक्शन बटण मिळणार आहे. हे आतापर्यंतचे सर्वात हलक्या वजनाचे प्रो मॉडेल्स असणार आहेत.
अॅपल आयफोन 15 ची किंमत 799 डॉलर्स एवढी असणार आहे. तर, आयफोन 15 प्लसची किंमत 899 डॉलर्स एवढी असणार आहे.
आयफोन-15 मध्ये यूएसबी टाईप-सी चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे.
iPhone 15 मध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. आयफोन 15 आणि आयफोन 15 प्लस या दोन्ही फोनमध्ये अगदी नवीन पद्धतीचा कॅमेरा वापरण्यात आला आहे.
आयफोन-15 आणि आयफोन15 प्लसचा फर्स्ट लुक समोर आला आहे. यामध्ये ड्युअल बॅक कॅमेरे देण्यात आले आहेत. पाच रंगांमध्ये हे फोन लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये iPhone 14 च्या तुलनेत दुप्पट ब्राईटनेस देण्यात आली आहे. iPhone 15 मध्ये 6.1 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. तर, iPhone 15 Plus फोनमध्ये 6.7 इंच मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे.
सीरीज 9 प्रमाणेच अॅपल वॉच अल्ट्रा 2 या स्मार्टवॉचमध्ये देखील S9 चिप देण्यात येणार आहे. या वॉचमध्ये नवीन मॉड्यूलर अल्ट्रा नावाचा वॉचफेस देण्यात आला आहे. याचा मोठा डिस्प्ले हा अॅपल वॉचचा आतापर्यंतचा सर्वात ब्राईट डिस्प्ले असणार आहे. ही आतापर्यंतची अॅपलची सर्वात रग्गड वॉच असणार आहे.
अॅपल आपल्या पर्यावरणासाठी कित्येक मोठी पावलं उचलत आहे. कार्बन इमिशन कमी करण्यासाठी अॅपलने आपल्या उत्पादनांमध्ये लेदर वापरणं बंद केलं आहे. अॅपल वॉच सीरीज 9 च्या कुठल्याही पट्ट्यामध्ये लेदरचा वापर होणार नाही. यासाठी अॅपलने एक नवीन प्रॉडक्ट लाँच केलं आहे. लेदरऐवजी अॅपल आता त्या प्रॉडक्टचा वापर करेल.
अॅपलची नवीन वॉच सीरीज 9 ही तुम्हाला एका हाताने देखील वापरता येणार आहे. यासाठी नवीन हँड जेस्चर डिटेक्शन टेक्निक वापरण्यात आली आहे. यामुळे तुम्ही ज्या हातामध्ये ही अॅपल वॉच घातली आहे, त्याचं पहिलं बोट केवळ तुमच्या अंगठ्यावर डबल टॅप करून तुम्ही वॉचला कमांड देऊ शकाल. फोन उचलणे, गाणं बदलणे अशा कित्येक गोष्टींसाठी हे जेस्चर वापरता येईल. यामुळे अॅपल वॉचचा वापर करणं अधिक सुलभ होणार आहे.
अॅपलने आपल्या वॉच सीरीजमधील नवीन मॉडेल, Apple Watch Series 9 हे लाँच केलं. या वॉचच्या डिझाईनमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. मात्र, यामध्ये S9 चिप देण्यात आलेली आहे. तसेच वॉच OS10 ही ऑपरेटिंग सिस्टीम यात असणार आहे.
यामुळे अॅपल वॉचच्या सॉफ्टवेअरमध्ये मोठे बदल पहायला मिळतात. तसेच, यामध्ये कित्येक नवीन फीचर्स देखील देण्यात आले आहेत. यामध्ये यूजर्स आपला हेल्थ डेटा आवाजाच्या माध्यमातून सिरीला विचारू शकणार आहेत.
अॅपलच्या वाँडरलस्ट इव्हेंटला सुरुवात झाली आहे. हा इव्हेंट तुम्ही अॅपल कंपनीच्या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह पाहू शकता.
इलॉन मस्कने आपल्या एक्स (ट्विटर) प्लॅटफॉर्मवरील लाईक बटणाचं अॅनिमेशन बदलून अॅपल इव्हेंटला प्रमोट केलं आहे. आता एखादी एक्स पोस्ट लाईक केल्यानंतर त्यातील बदामात वेगळा रंग दिसून येत आहे.
आजच्या इव्हेंटमध्ये मेड-इन-इंडिया आयफोन-15 सादर करण्यात येणार असल्याचं ब्लूमबर्गने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. यामुळे लाँचिंगनंतर भारतात नवा आयफोन येण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. ही भारतीय यूजर्ससाठी आनंदाची गोष्ट आहे.
अॅपलचा हा इव्हेंट कॅलिफोर्निया येथील अॅपल कॅम्पसमध्ये असणाऱ्या स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये पार पडणार आहे. या कार्यक्रमात आयफोन-15 सोबतच नवीन अॅपल वॉच, नवीन एअर पॉड्स आणि ओएस अपडेट्स जाहीर करण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाला काही मिनिटं शिल्लक असताना अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी एक एक्स (ट्विटर) पोस्ट करून फॅन्सचं लक्ष वेधून घेतलं आहे. "लवकरच भेटू" अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.