Apple iPhone 16 Launch : ॲपल इव्हेंटमध्ये लाँच झाले खास प्रॉडक्ट्स, iPhone 16 आणि सगळंच एकदम स्पेशल,पाहा फीचर्स आणि किंमत

Apple iPhone 16 Launch Event 2024 : Apple ने काल iPhone 16 लाँच केला आहे. त्याचबरोबर ॲपल इव्हेंटमध्ये AirPods 4 आणि Apple Watch Series 10चे लाँच करण्यात आले.
 iPhone 16 Series AirPods 4 and Apple Watch Series 10 Launched
iPhone 16 Series AirPods 4 and Apple Watch Series 10 Launchedesakal
Updated on

Apple Products Launch 2024 All Updates: Apple ने काल 'इट्स ग्लो टाइम' इव्हेंटमध्ये अनेक आकर्षक घोषणा केल्या. iPhone 16 लाँच झाला आहे. टेक प्रेमी या सीरिजच्या प्रतीक्षेत होते. यामध्ये सर्वात आकर्षक ठरले ते म्हणजे AI-आधारित iPhone 16 सीरीज.

या नवीन सीरीजमध्ये iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max असे चार मॉडेल समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे ही सर्व मॉडेल्स Apple ची नवीन तंत्रज्ञान 'Apple Intelligence' सह सुसज्जित आहेत. यापूर्वी जूनमध्ये कंपनीने Apple Intelligence लाँच केले होते. हे एक वैयक्तिक बुद्धिमत्ता प्रणाली असून ते फोन वापरण्याचा अनुभव अधिक सहज आणि प्रभावी करेल असा कंपनीचा दावा आहे.

13 सप्टेंबरपासून प्री-बूकिंगची सुविधा सुरू होणार आहे. तसेच 20 सप्टेंबरपासून हे प्रॉडक्ट विक्रीसाठी उपलब्ध असतील असे सांगण्यात आले आहे.

 iPhone 16 Series AirPods 4 and Apple Watch Series 10 Launched
iPhone 16 Launch : इट्स ग्लोटाइम! iPhone 16 सीरिज झाली लाँच; AI फीचर्स अन् कॅमेरा एकदम खास,पाहा सर्व डिटेल्स एका क्लिकमध्ये..

या कार्यक्रमात बोलताना Apple चे सीईओ टिम कुक म्हणाले, "आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगमुळे अनेक आधुनिक फीचर्स आणि अनुभव आम्हाला मिळाले आहेत. Apple Intelligence हा आमचा नवीन, प्रभावी वैयक्तिक बुद्धिमत्ता प्रणाली आहे. त्याचा आपल्या सर्वांच्या फोन वापरण्याच्या अनुभवावर मोठा प्रभाव पडणार आहे. Apple Intelligence सह तयार केलेले हे पहिले iPhone लाँच करण्याचा आम्हाला खूपच आनंद आहे."

 iPhone 16 Series AirPods 4 and Apple Watch Series 10 Launched
iPhone 16 Price : आला आला आयफोन 16, धमाकेदार फीचर पण भारतात किंमत किती?

या कार्यक्रमात फक्त iPhoneच नाही तर इतरही प्रॉडक्टच्या घोषणा झाल्या. यामध्ये स्लीप अ‍ॅपनिया (झोपेत श्वास अडखळण्याची समस्या) ओळखणारी Apple Watch Series 10, नवीन रंगात येणारी Apple Watch Ultra 2 आणि दोन प्रकारच्या AirPods 4 ची घोषणा करण्यात आली. यातील एका AirPods 4 मध्ये Active Noise Cancellation (बाहेरचा आवाज कमी करणारी सुविधा) समाविष्ट आहे तर दुसऱ्या AirPods Pro मध्ये वापरकर्त्यांना त्यांची ऐकण्याची क्षमता तपासण्याची आणि ऐड-एड (श्रवणयंत्र) सारख्या सुविधांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.