जगभरात नावाजला गेलेला आयफोन घेणं आता तुमच्यासाठी अधिक सोपं झालं आहे. कारण नवीन आयफोन 14 सीरिज लाँच होते आहे. त्यामुळे नवीन सीरिज लाँच झाली की जुने आयफोन स्वस्त होतात. आणि हे दरवर्षीचं घडतं. सध्या ई-कॉमर्स शॉपिंग वेबसाइटवर आयफोनवर सुट देणं सुरू आहे. तर काही वेबसाईटवर एक्सचेंज डील सुद्धा सुरू आहे.
सध्या iPhone 11 आणि iPhone 12 फोनवर मोठी सूट दिली जात आहे. या स्मार्टफोनच्या किंमतीत घट करण्यात आली असून त्यासोबतच एक्जेंच ऑफर देखील जाहीर करण्यात आली आहे. या खरेदीतून नाही म्हटलं तरी 18,000 पर्यंतची बचत करण्याची संधी मिळणार आहे.
फ्लिपकार्टवर iPhone 11 वर एक्स्चेंज ऑफर...
सध्या फ्लिपकार्टवर आयफोन 11 एक्स्जेंच ऑफरच्या माध्यमातून खरेदी करत असाल तर तुम्हाला त्यावर जास्तीत जास्त 17000 रुपयांचा डिस्काऊंट मिळवता येऊ शकेल. मूळ Apple iPhone 11 च्या 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 54,900 रुपये इतकी आहे. एक्स्चेंज ऑफरमध्ये तो तुम्हाला 37,900 रुपयांना मिळेल. तेच एक्स्चेंज ऑफर सोडून तुम्हाला Apple iPhone 11 डिस्काउंटनंतर 49,900 रुपयांना मिळेल. हा आयफोन 11 हिरवा, लाल, काळा, पांढरा, पिवळा आणि जांभळा रंगात खरेदी करता येईल.
ई- कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर आयफोन 11 वर अनेक बँकांच्या ऑफर्स उपलब्ध आहेत...
1. तुम्ही IDFC FIRST क्रेडिट कार्डवरून फोन बुक केल्यास मूळ किंमतीवर 1000 रुपयांची बचत करू शकता.
2. जर तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्यावर तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळू शकतो.
फ्लिपकार्टवर iPhone 12 च्या किंमतीही घट...
सध्या फ्लिपकार्टवरून iPhone 12 ऑर्डर केल्यास तुम्हाला 18,000 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. स्टँडर्ड 64 GB स्टोरेज व्हेरिएंट तुम्ही 59,999 रुपयांना खरेदी करू शकता. यावर तुम्हाला 8 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. यासोबतच तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये 17,000 रुपयांपर्यंतची बचत करू शकता.
बँकेच्या ऑफरबद्दल बोलायचं झाल्यास, तुम्ही फेडरल बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवरून फोन बुक केल्यास तुम्हाला 1000 रुपयांपर्यंत बचत करता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.