iPhone 14: आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत मिळतोय लेटेस्ट आयफोन, पहिल्यांदाच बंपर डिस्काउंटसह खरेदीची संधी

काही महिन्यांपूर्वीच लाँच झालेल्या iPhone 14 स्मार्टफोनच्या सीरिजला खूपच स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. फोनवर पहिल्यांदाच बंपर डिस्काउंट मिळत आहे.
iphone
iphoneSakal
Updated on

Offer On iPhone 14: अ‍ॅपलने काही महिन्यांपूर्वीच आयफोन १४ सीरिजला भारतात सादर केले आहे. या सीरिज अंतर्गत iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max चा समावेश आहे. आयफोन १४ च्या १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची सुरुवाती किंमत ७९,९०० रुपये आहे. मात्र, कंपनी पहिल्यांदाच या फोनवर बंपर डिस्काउंट देत आहे. ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवरून आयफोन १४ ला आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. या फोनवर मिळणाऱ्या ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

iPhone 14 वर मिळेल आकर्षक ऑफर्सचा फायदा

iPhone 14 स्मार्टफोन १२८ जीबी, २५६ जीबी आणि ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. फोनच्या तिन्ही व्हेरिएंटला Amazon वरून डिस्काउंटसह खरेदी करू शकता. फोनचे १२८ जीबी व्हेरिएंट २ हजारांच्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. डिस्काउंटनंतर फोनला फक्त ७७,९०० रुपये किंमतीत खरेदी करू शकता.

दोन्ही ऑफर्सचा फायदा मिळाल्यास हे मॉडेल फक्त ७२,९०० रुपयात तुमचे होईल. याशिवाय, ८९,९०० रुपयांच्या २५६ जीबी मॉडेलला ८२,९०० रुपये आणि ५१२ जीबी मॉडेलला १,०२,९०० रुपयात खरेदी करू शकता. आयफोनवर १६,३०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. म्हणजेच एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळाल्यास फोनला २० हजार रुपये स्वस्तात खरेदी करू शकता.

iphone
Hero Bike: हीरोने भारतात लाँच केली भन्नाट बाईक, पॉवरफुल इंजिनसह मिळेल बरचं काही; पाहा किंमत

iPhone 14 चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

iPhone 14 मध्ये ६.१ इंच सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ११७०x२५३२ पिक्सल आणि पीक ब्राइटनेस १२०० निट्स आहे. फोनमध्ये ए१५ बायोनिक प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. आयफोनला शानदार कॅमेऱ्यासाठी ओळखले जाते. या मॉडेलमध्ये देखील शानदार कॅमेरा देण्यात आला असून, यात १२ मेगापिक्सल रियर कॅमेरा सेटअप आणि १२ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळेल. तसेच, ई-सिम आणि सेटेलाइट कनेक्टिव्हिटाचा देखील सपोर्ट दिला आहे.

हेही वाचा: National Mathematic Day: अवघड गणित क्षणार्धात सोडवणाऱ्या शकुंतला देवी; 'ह्यूमन कॉम्प्युटर' म्हणून होत्या परिचित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()