Apple ची फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज iPhone 14 चे लॉन्चिंग या वर्षी सप्टेंबर 2022 मध्ये होणार आहे. लॉन्चच्या आधी, आयफोन 14 सीरीजबद्दल दररोज नवीन खुलासे केले जात आहेत. पण आता iPhone 14 Max मॉडेलची किंमत लीक झाली आहे. दरम्यान Apple ने आगामी iPhone 14 Max स्मार्टफोनबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. (Apple iPhone 14 Max price leak)
संभाव्य किंमत काय असेल?
लीक झालेल्या रिपोर्टवर विश्वास ठेवायचा झाल्यास iPhone 14 Max भारतात जवळपास 899 डॉलर मध्ये लॉन्च केला जाईल, ज्याची भारतीय किंमत 69,180 रुपये आहे. पण आयात शुल्क आणि जीएसटीमुळे भारतात iPhone 14 Max ची किंमत एक लाख रुपयांपेक्षा जास्त असेल.
iPhone 14 कधी लॉन्च होईल?
Apple iPhone 14 ची लॉन्च तारीख समोर आलेली नाही. पण या वर्षी सप्टेंबरमध्ये iPhone 14 सीरीज लाँच होण्याची शक्यता आहे. Apple iPhone 14 स्मार्टफोन सीरिज अंतर्गत iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Pro Max आणि iPhone 14 Pro Max हे मॉडेल सादर केले जातील.
स्पेसिफिकेशन्स काय असतील?
Apple iPhone 14 स्मार्टफोन 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल. फोनमध्ये Appleचा A15 बायोनिक चिपसेट दिला जाऊ शकतो. हा फोन 6GB रॅम आणि 256GB स्टोरेज पर्यायात येईल. Apple iPhone 14 स्मार्टफोनमध्ये 6.68-इंचाचा OLED पॅनल सपोर्ट दिला जाईल. त्याचे पिक्चर रिझोल्यूशन 2,248 x 1,284 पिक्सेल असेल.
तसेच Apple iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max स्मार्टफोनमध्ये नवीन A16 Bionic प्रोसेसर सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यामध्ये मुख्य कॅमेरा 12 मेगापिक्सल्सचा असेल. iPhone 14 Max स्मार्टफोनमध्ये फेस आयडी सेन्सर सपोर्ट दिला जाईल. Apple iPhone 14 Mini स्मार्टफोनमध्ये मोठा 6.7-इंचाचा डिस्प्ले असेल, तर फोनचे बेस मॉडेल 128GB स्टोरेज ऑप्शनमध्ये येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.