12 सप्टेंबर रोजी एका मोठ्या इव्हेंटमध्ये अॅपल आपली कित्येक उत्पादने लाँच करणार आहे. वाँडरलस्ट असं नाव असलेल्या या कार्यक्रमात नवीन आयफोन 15 सीरीज देखील लाँच करण्यात येणार आहे. लाँचच्या आधीच सोशल मीडियावर iPhone 15 आणि iPhone 15 Pro च्या डमीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडिओमध्ये दिसून येतंय, की iPhone 15 Pro मध्ये अॅक्शन बटण देण्यात आलं आहे. आधीच्या मॉडेलमध्ये असणाऱ्या रिंग बटणची जागा हे नवं अॅक्शन बटण घेणार आहे. हे एक मल्टिफंक्शन बटण असणार आहे, असंही म्हटलं जात आहे.
व्हिडिओमध्ये दाखवलेले डमी फोन्स हे सिल्व्हर, ब्लॅक, टायटन ग्रे आणि डार्क ब्लू या रंगांमध्ये आहेत. म्हणजे आयफोन-15 चं प्रो मॉडेल हे या चार रंगांमध्ये लाँच केलं जाईल असा अंदाज बांधण्यात येतोय. याचा लुक बराचसा iPhone 14 सारखाच दिसत आहे.
दुसरीकडे, आयफोन-15 च्या बेस मॉडेलमध्ये पाच कलर ऑप्शन दिसून येत आहेत. यात गुलाबी, पिवळा, पांढरा, काळा, आणि निळा असे पर्याय उपलब्ध आहेत. बेस मॉडेलमध्ये पूर्वीप्रमाणेच रिंग किंवा सायलेंट बटण दिलं जाऊ शकतं, असं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.