Apple iPhone 15 Launch : अखेर प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी लाँच होणार नवा आयफोन; अ‍ॅपलने केलं कन्फर्म

apple iphone 15 launch date confirm  waderlust event on 12 september apple send invites check expected product price
apple iphone 15 launch date confirm waderlust event on 12 september apple send invites check expected product price
Updated on

Apple iPhone 15 Launch Date : अ‍ॅपलच्या आयफोन 15 सीरीजची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नवीन आयफोनच्या प्रतीक्षा अखेर संपणार आहे. कॅलिफोर्नियातील दिग्गज कंपनी अ‍ॅपलने नवा आयफोन लॉन्च होण्याच्या तयारीत असल्याची घोषणा केली आहे.

अ‍ॅपलचा 'Wanderlust' इव्हेंट 12 सप्टेंबर रोजी आयोजित केला जाईल आणि इव्हेंट ऑनलाइन लाइव्हा स्ट्रीम देखील करण्यात येणार आहे . या इव्हेंटमध्ये, कंपनी आपली iPhone 15 सीरीज तसेच इतर अनेक उत्पादने लॉन्च करेल, ज्यामध्ये Apple Watch 9, Apple Watch Ultra 2 यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

याशिवाय इव्हेंटमध्ये iOS 17 आणि WatchOS देखील सादर केले जाऊ शकतात. मात्र, अ‍ॅपल इव्हेंटमध्ये कोणते प्रोडक्ट लॉन्च केले जातील याबद्दलची कुठलीही माहिती कंपनीने दिलेली नाही.

अ‍ॅपलने अधिकृतपणे 'Wanderlust' या लॉन्च इव्हेंटसाठी आमंत्रणे पाठवली आहेत. कार्यक्रम 12 सप्टेंबर रोजी Apple पार्क येथे सकाळी 10am PT ( भारतीय वेळ रात्री 10.30) वाजता सुरू होईल. हा लॉन्च इव्हेंट Apple.com आणि Apple TV अ‍ॅपवर थेट ऑनलाइन स्ट्रीम केला जाईल.

आगामी लॉन्च इव्हेंटमध्ये आयफोन 15 मालिका लॉन्च होईल, ज्यामध्ये आयफोन 15, आयफोन 15 प्लस, आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्सचा समावेश असेल. या व्हेरिएंट्सची वैशिष्ट्ये, डिझाइन तसेच कलर ऑप्शन्सबद्दल अनेक अफवा आधीच समोर येत आहेत.

apple iphone 15 launch date confirm  waderlust event on 12 september apple send invites check expected product price
Chandrayaan 3 Photo : स्माईल प्लीज! 'प्रज्ञान रोव्हर'ने क्लिक केला 'विक्रम लँडर'चा फोटो; इस्रोने केला शेअर

काय खास असेल?

या आयफोन सीरीजमध्ये सर्वात मोठे अपडेट लाइटनिंग पोर्टऐवजी USB टाइप-सी चार्जिंग पोर्ट हा असेल. याशिवाय, Apple Watch Series 9 आणि Apple Watch Ultra 2 या दोन नवीन स्मार्टवॉच कंपनीच्या इव्हेंटमध्ये सादर केल्या जाण्याची शक्यता आहे. Apple Watch Series 9 मध्ये अ‍ॅल्युमिनियम बॉडीसह पाच रंग आणि स्टेनलेस स्टील मॉडेलसाठी तीन कलर ऑप्शन्स दिले जाऊ शकतात.

apple iphone 15 launch date confirm  waderlust event on 12 september apple send invites check expected product price
Mumbai High Court : औरंगाबाद अन् उस्मानाबाद नामांतर प्रकरणात मोठी अपडेट! दोन्ही जिल्ह्यांची नावे तीच राहणार

किंमतही झाली लीक

काही दिवसांपूर्वी या नवीन आयफोनच्या किंमतीबाबतही माहिती समोर आली होती. एका रिपोर्टनुसार, iPhone 15 आणि त्याच्या प्लस व्हर्जनच्या किमती तशाच राहू शकतात. याचा अर्थ रेग्युलर iPhone 15 ची किंमत यूएस मध्ये $799 आणि भारतात 79,900 रुपये असू शकते.

Apple आयफोन 13 सारख्याच किमतीत रोग्युलर मॉडेल विकण्याची ही दुसरी वेळ असेल. तर iPhone 15 Plus ची किंमत $899 किंवा भारतात 89,900 रुपये असू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.