अॅपलने नुकतीच आपली आयफोन-15 सीरीज लाँच केली आहे. कित्येक लोकांनी यासाठी प्री-बुकिंग देखील सुरू केलं आहे. आयफोनचे नवीन चार मॉडेल लाँच करण्यात आले आहेत. मागील आयफोन-14 च्या तुलनेत नवीन फोनमध्ये कित्येक बदल करण्यात आले आहेत.
नवीन आयफोन आल्यामुळे आता मागील मॉडेल घेण्याचा विचारही कित्येक जण करत आहेत. तसंच, ज्यांच्याकडे आधीपासून आयफोन 14 Pro आहे असे लोकही नवीन आयफोन घ्यावा की नको याबाबत विचार करत आहेत. यामुळेच, आयफोन 14 Pro आणि 15 Pro या दोन्ही फोनमध्ये नेमका काय फरक आहे याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
iPhone 15 Pro ची किंमत 1,34,900 रुपये आहे. नवीन आयफोन लाँच झाल्यामुळे iPhone 14 Pro हा आधीपेक्षा स्वस्तात मिळत आहे. सध्या ई-कॉमर्स साईट्सवर हा फोन 1,19,999 रुपयांना खरेदी करता येतो आहे.
या दोन्ही फोनमध्ये 6.1 इंच OLED स्क्रीन मिळते. याचं रिझॉल्यूशन 2,556x1,179 पिक्सेल्स आहे. या दोन्ही फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट मिळतो. यातील पिक्सेल डेन्सिटी 460 ppi एवढी आहे. दोन्ही फोनमध्ये iOS17 ही ऑपरेटिंग सिस्टीम मिळते.
या दोन्ही फोनमध्ये प्रायमरी कॅमेरा हा 48 मेगापिक्सलचा मिळतो. यात 12 मेगापिक्सल अल्ट्रावाईड लेन्स, 12 मेगापिक्सल टेलिफोटो लेन्स देण्यात आली आहे. फ्रंट कॅमेरा दोन्ही फोनमध्ये 12 MP आहे. या दोन्ही फोनमध्ये 4K व्हिडिओ रेकॉर्ड होतो.
दोन्ही फोनमध्ये एक्स्पांडेबल स्टोरेज मिळत नाही. फिंगरप्रिंट सेन्सर मिळत नाही. डायनॅमिक आयलँड, अल्वेज ऑन डिस्प्ले, 5G, IP68 रेटिंग असे फीचर दोन्ही फोनमध्ये मिळतात. या दोन्ही फोनमध्ये हेडफोन जॅक मिळत नाही.
'आयफोन-15 प्रो'चा आकार हा आयफोन-14 प्रो पेक्षा मोठा आहे. मात्र, याचं वजन हे कमी आहे. आयफोन 14 Pro चं वजन 206 ग्रॅम आहे, तर आयफोन 14 Pro चं वजन 187 ग्रॅम आहे.
याव्यतिरिक्त आयफोन 15 मध्ये करण्यात आलेला मोठा बदल म्हणजे यात यूएसबी-सी चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. तर आयफोन 14 मध्ये लाईटनिंग पोर्ट आहे. तसंच 15 Pro मध्ये A17 बायोनिक चिप देण्यात आली आहे. 14Pro मध्ये A16 बायोनिक चिप आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.