Apple 2024 मध्ये नवीन iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max मॉडेल्स लाँच करणार आहेत, तर डिस्प्ले आकार सुमारे 6.3 इंच आणि 6.9 इंच आहेत. हे नवीन आकार आयफोनसाठी आतापर्यंतचे सर्वात मोठे असतील, असे बोलले जाते की आयफोनचा हा सर्वात मोठा डिस्प्ले असू शकतो. रिपोर्ट्सनुसार, Apple पुढील वर्षी सिरीजच्या आयफोनचा स्क्रीनचा आकार वाढवू शकते.
Phone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मॉडेल 6.1 इंच आणि 6.7 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. या वर्षी लॉन्च होणार्या आयफोनच्या प्रो मॉडेल्सच्या आकारात कोणताही बदल होणार नाही. अशी माहिती उद्योग विश्लेषक यंग यांनी दिली आहे. याआधीही यंगने दिलेली माहिती खरी असल्याचे सिद्ध झालं होतं.
त्यांनी आयफोन 13 pro आणि 14-इंचासह 16-इंचाच्या मॅकबुक प्रोमध्ये प्रोमोशनविषयी सांगितलं होतं. तसेच आयपॅड मिनीच्या 6व्या जनरेशनमध्ये मोठा 8.3-इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो.
Apple iPhone 16 Pro Max
परफॉर्मंस - ऍपल A16 बायोनिक
डिस्प्ले - 6.25 इंच (15.88 सेमी)
स्टोरेज - 128GB
कॅमेरा - 13MP + 13MP + 13MP
बॅटरी - 4700mAh
भारतात किंमत - 95990
रॅम - 6GB
iPhone 15 ची स्क्रीन साईज
iPhone 15 pro, जो सप्टेंबर 2023 मध्ये लॉन्च होईल, कंपनी त्याच्या स्क्रीनच्या आकारात कोणताही बदल करणार नाही. iPhone 15 मॉडेलमध्ये दोन 6.1-इंचाचे iPhone आणि दोन 6.7-इंचाचे iPhone असू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.