iPhone 17 Air Leaks : iPhone 17 Airची डिझाईन अन् फीचर्स झाले लिक; कधी होणार लाँच? सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Air Deatails : Apple iPhone 17 Air 2025 लॉंच होण्याची शक्यता आहे. iPhone 17 मध्ये जबरदस्त बदल झाले असून नवीन डिझाइन, कॅमेरा आणि शक्तिशाली चिपसेटची चर्चा सुरू आहे.
iPhone 17 Air Features Design Leaked
iPhone 17 Air Features Design Leakedesakal
Updated on

iPhone 17 Launch Features Design Leaked : Apple कंपनी 2025 मध्ये त्यांचा नवा फोन iPhone 17 Air लाँच करण्याच्या तयारीत आहे. इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार, हा फोन Apple च्या इतिहासातील सर्वात स्लिम असू शकतो. या फोनसाठी अनेक मोठे बदल करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामध्ये नवीन डिझाइन, मोठा डिस्प्ले, प्रगत कॅमेरा आणि अत्याधुनिक A19 चिपचा समावेश आहे.

iPhone 17 Air डिझाइन

iPhone 17 Air मध्ये अत्यंत स्लीक आणि आकर्षक डिझाइन असणार आहे. या फोनमध्ये नवीन टायटॅनियम फ्रेमचा वापर होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तो हलका व अधिक टिकाऊ असेल. त्याचबरोबर, फोनचा जाडी घटवून सर्वात स्लिम iPhone बनवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

iPhone 17 Air डिस्प्ले

iPhone 17 Air मध्ये 6.6 इंचाचा Super Retina XDR OLED डिस्प्ले असेल, जो रंग अधिक स्पष्ट व गडद ब्लॅक टोन दाखवेल. यासोबतच, 120Hz चा रिफ्रेश रेट देण्याची शक्यता असून, या मालिकेत अंडर-डिस्प्ले फेस आयडी तंत्रज्ञानाचा समावेश होऊ शकतो, ज्यामुळे फोनचा फ्रंट अधिक आकर्षक बनेल.

iPhone 17 Air Features Design Leaked
Samsung Discount Offer : खुशखबर! 6 हजारांपेक्षा कमी किंमतीत सॅमसंगचा ब्रँड 5G स्मार्टफोन; कुठं सुरूय खास ऑफर? लगेच बघा

iPhone 17 Air कॅमेरा

iPhone 17 Air च्या कॅमेरा प्रणालीत मोठे बदल करण्यात येत असून, 48-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि नवीन पेरिस्कोप लेंस यांचा समावेश असणार आहे. यामुळे कमी प्रकाशात चांगली फोटोग्राफी आणि लांबच्या वस्तूंच्या जवळून फोटो काढण्याची क्षमता वाढेल. सेल्फीसाठी 24-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे.

iPhone 17 Air Features Design Leaked
Flipkart Big Diwali Sale : उद्यापासून फ्लिपकार्टचा Big Diwali Sale सुरू; काय आहेत खास डिस्काउंट ऑफर्स? पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Air चिपसेट

iPhone 17 Air मध्ये नवीन A19 चिप असेल, जी A18 प्रमाणेच 3nm प्रक्रियेवर आधारित असेल. या चिपमुळे फोनची कार्यक्षमता अधिक वेगवान होईल, खासकरून गेमिंग आणि मल्टीटास्किंगमध्ये. मशीन लर्निंगमध्येही सुधारणा होण्याची शक्यता आहे, ज्याचा फोटोग्राफी आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी सारख्या क्षेत्रांवर परिणाम होईल.

Apple च्या आगामी iPhone 17 Air बद्दल तंत्रज्ञान प्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.