Apple Cyber Threat : मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती हिला अॅपलकडून स्पायवेअरची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर सायबर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. अश्यात भारतासह ९८ देशातील iPhone वापरणाऱ्यांसाठी सायबर हल्ल्याचा मोठा धोका असल्याची धक्कादायक माहिती कंपनीने दिली आहे.
अॅपल कंपनीने त्यांच्या वापरकर्त्यांना पेगासससारख्या स्पायवेअरच्या हल्ल्याविषयी सतर्क केले आहे. या हल्ल्याद्वारे तुमचा फोन पूर्णपणे हॅक होऊ शकतो. अॅपलने गेल्या दहा महिन्यांत दुसऱ्यांदा वापरकर्तांना अशा हल्ल्याविषयी इशारा दिला आहे.
अॅपलने दिलेल्या इशार्यानुसार, " तुमच्या Apple IDशी संबंधित असलेल्या iPhone वर दूरस्थपणे हल्ला करण्याचा प्रयत्न केला जात आहे." असा दावा केला आहे. ही स्पायवेअरची व्याप्ती फक्त तुम्हीच आहात असे दिसून येते. तुमच्या महत्वाच्या माहितीची चोरी होण्याची शक्यता आहे. अॅपलने या हल्ल्याविषयी खात्री दिलेली नसली तरी वापरकर्तांनी याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची विनंती केली आहे.
याआधी अॅपलने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारतातील वापरकर्त्यांना अशाच प्रकारच्या हल्ल्याविषयी इशारा दिला होता. यावर्षी एप्रिलमध्येही अॅपलने धमकीचे संदेश पाठवून 92 देशातील लोकांना (भारतातील काही जणांचा समावेश) लक्ष्य केले असण्याची शंका आहे.
2021 पासून अॅपलने दरवर्षी अनेकदा धोका सूचक संदेश पाठवून वापरकर्त्यांना सजग राहण्याचे आवाहन केले आहे. भारता सरकारनेही अॅपल उत्पादनांमधील break through विषयी नागरिकांना आगामी केले आहे.
भारतीयांवर अनेकप्रकारे सायबर हल्ले होत असल्याने,तसेच त्यांच्यासोबत फ्रॉडच्या घटना देखील वाढले आहेत. अश्यात स्वतःची आणि स्वतःच्या मोबाईलची सुरक्षा करणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही नेहमी सतर्क राहणे गरजेचे आहे. तुमचा मोबाईल हॅक होण्याची शंका असल्यास लगेच सायबर सेलकडे तक्रार करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.