Apple ने नुकतीच आयफोन 13 सिरीज जागतिक स्तरावर लॉंच केली. त्यानंतर अशी अपेक्षा होती, की हा फोन मोठ्या प्रमाणात विकला जाईल. परंतु...
Apple ने नुकतीच आयफोन 13 सिरीज जागतिक स्तरावर लॉंच केली. त्यानंतर अशी अपेक्षा होती, की हा फोन मोठ्या प्रमाणात विकला जाईल. परंतु, अलीकडेच जगभरात चिपची कमतरता जाणवत आहे, त्यामुळे इतर अनेक कंपन्यांप्रमाणे Appleलाही चिपच्या टंचाईमुळे निर्मिती समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ब्लूमबर्गच्या ताज्या अहवालानुसार, चिपच्या कमतरतेमुळे Apple आपल्या iPhone 13 सिरीजचे उत्पादन 10 दशलक्ष युनिट्सने कमी करत आहे.
iPhone 13 निर्मितीमधील मोठी समस्या
Apple 2021 च्या अखेरीस 90 दशलक्ष iPhone 13 युनिट्सचे उत्पादन करेल अशी अपेक्षा होती; परंतु असे दिसून येते की Apple च्या उत्पादन भागीदारांनी त्यांना सूचित केले आहे, की चिपच्या कमतरतेमुळे एकूण उत्पादन खूपच कमी असू शकते. या समस्येमुळे Apple ने 10 दशलक्ष युनिट्स (सुमारे 11 टक्के) पर्यंत उत्पादन कमी केले आहे.
iPhone 13 मालिकेतील प्राथमिक A 15 बायोनिक चिपसेट टीएसएमसीद्वारे तयार केले जात असताना, इतर स्रोतांकडून आलेले बरेच चिप-आधारित घटक आहेत. iPhone 13 मॉडेल ब्रॉडकॉम AFEM-8215 फ्रंट-एंड मॉड्यूल आणि ब्रॉडकॉम BCM59365 वायरलेस पॉवर रिसीव्हरचा वापर करते. डिस्प्ले पॉवर मॅनेजमेंट IC, ऍरे ड्रायव्हर, फ्लॅश LED ड्रायव्हर आणि टेक्सास इन्स्ट्रुमेंट्सचे ड्युअल रिपीटर वापरतात. Apple च्या नवीन मॅकबुक प्रोच्या आगामी लॉंचिंगबरोबर Apple ला लॅपटॉप उत्पादनात देखील समस्या येऊ शकते. अलीकडेच, संशोधक मिंग-ची कुओ यांनी सांगितले की, घटक साहित्य उपलब्ध नसल्यामुळे Apple आपली मॅकबुक शिपमेंट अर्धी करेल.
पुरवठ्याच्या मुद्द्यावर Apple चे विधान
Apple चे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी कंपनीच्या Q3 अर्निंग कॉलवर आधीच सांगितले आहे की भविष्यात चिपची कमतरता असू शकते. ते पुढे असेही म्हणाले की, "आम्ही ज्या परिस्थितींना सामोरे जात आहोत ते कमी करण्यासाठी आम्ही सर्वकाही करू.' परंतु असे दिसते की Apple च्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही त्यांच्या आयफोनचे उत्पादन वाढवण्यासाठी पुरेसे भौतिक युनिट्स मिळत नाहीत.
Apple iPhone 13 आणि iPhone 13 Mini ची वैशिष्ट्ये
iPhone 13 स्मार्टफोनमध्ये 6.1 - इंच सुपर रेटिना एक्सडीआर ओएलईडी डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 2532x1170 पिक्सेल आहे. Apple चे हे दोन्ही स्मार्टफोन 128 GB, 256 GB आणि 512 GB स्टोअरेज व्हेरिएंटसह सादर करण्यात आले आहेत. चांगल्या गुणवत्तेसाठी A15 बायोनिक चिप त्यांच्यामध्ये वापरली गेली आहे. हे स्मार्टफोन IP68 रेटिंगसह येतात, म्हणजे ते पूर्णपणे वॉटरप्रूफ आहेत. हे फोन सहा मीटर खोल पाण्यातही अर्धा तास काम करतील. आयफोन 13 मध्ये 12 मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये पहिला वाइड आणि दुसरा अल्ट्रा वाइड अँगल सपोर्ट करतात. त्याचबरोबर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12 मेगापिक्सलचा कॅमेराही देण्यात आला आहे. व्हिडिओसाठी त्यात सिनेमॅटिक मोड देण्यात आला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन उत्पादन रेड, स्टारलाईट, मिडनाईट, निळा आणि गुलाबी रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.