अॅपल कंपनीचा एक मोठा इव्हेंट काही दिवसांपूर्वीच पार पडला होता. यामध्ये आयफोन 15 सीरीज आणि इतर प्रॉडक्ट्स लाँच करण्यात आले होते. आता ऑक्टोबरच्या शेवटी अॅपलचा आणखी एक इव्हेंट पार पडणार आहे. 'स्केरी फास्ट' असं या इव्हेंटचं नाव असणार आहे. अमेरिकेतील वेळेनुसार 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता हा इव्हेंट सुरू होईल.
भारतीय वेळेनुसार हा इव्हेंट 31 ऑक्टोबर रोजी पहाटे 5.30 वाजता सुरू होईल. हा एक प्री-रेकॉर्डेड इव्हेंट असेल. याला कंपनीची अधिकृत वेबसाईट, यूट्यूब चॅनल आणि सोशल मीडिया हँडलवरुन पाहता येईल. ब्लूमबर्गने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, अॅपलच्या या इव्हेंटमध्ये 24 इंच स्क्रीनच्या iMac चे रिफ्रेश्ड व्हर्जन लाँच करण्याची शक्यता आहे. यामध्ये M2 किंवा M3 चिप असेल. तसंच, कंपनी नवीन 14 इंच आणि 16 इंच स्क्रीनच्या 'मॅकबुक प्रो' लॅपटॉपची देखील घोषणा करू शकते. यामध्ये 3nm M3 Pro आणि M3 Max चिप दिली जाऊ शकते.
नेक्स्ट जनरेशनच्या अॅपल सिलिकॉन चिप्समध्ये 16 CPU कोअर आणि 60 GPU कोअर आहेत. सेकंड जनरेशन अॅपल सिलिकॉन चिप्सच्या तुलनेत या चिप अधिक वेगवान आणि पॉवर एफिशिएंट आहेत. यामुळेच या इव्हेंटला 'स्केरी फास्ट' असं नाव दिलं असल्याची चर्चा सुरू आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.