Apple iOS 16.1: Apple चे नवीन अपडेट 'या' दिवशी होणार रिलीज; मिळतील दमदार फीचर्स

apple set to roll out ios 16.1 update on oct 24 know its features and details
apple set to roll out ios 16.1 update on oct 24 know its features and details
Updated on

तुम्ही जर आयफोन यूजर असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Apple ने iOS 16, iOS 16.1 साठी नवीन अपडेट जारी करण्याची घोषणा केली आहे. कंपनी सोमवारी 24 ऑक्टोबर रोजी हे अपडेट जारी करणार आहे. कंपनीने iOS 16.1 सध्या बीटा आवृत्तीसाठी रिलीज करण्यात आली आहे.

iOS 16.1 सह, iPhone वापरकर्त्यांना कॉपी-पेस्ट फंक्सनॅलिटीवर डिप कंट्रोल, लाइव्ह एक्टिव्हीटी आणि चार्जिंगमध्ये अपडेशन मिळेल. Apple ने या वर्षी जूनमध्ये त्यांच्या वर्ल्ड वाइड डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये iOS 16 सादर केला होता. त्यानंतर आयफोन 14 सीरीज iOS 16 सह लॉन्च करण्यात आली.

Apple ने iOS 16.1 च्या घोषणेसह iPadOS 16 चे रोलआउट करण्याची घोषणा केली. तथापि, आधीच असा अंदाज लावला जात होता की Apple iOS 16.1 आणि iPadOS 16 एकाच वेळी सादर करू शकते. सर्व iOS 16 iPhone वापरकर्त्यांना सोमवारी नवीन अपडेट मिळेल. तसेच, iPhone 8 आणि iPhone 9 सह, सर्व लेटेस्ट iPhone वापरकर्त्यांना iOS 16.1 अपडेट मिळेल.

apple set to roll out ios 16.1 update on oct 24 know its features and details
स्वस्तात खरेदी करा 43-इंचाचा Smart TV; फ्लिपकार्ट सेलमध्ये मिळतेय बंपर ऑफर

iOS 16.1 चे फीचर्स

ऑपरेटिंग सिस्टमच्या नवीन अपडेटमध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. या अपडेटनंतर, iPhone वापरकर्ते Apple Watch शिवाय देखील Apple Fitness+ चे सदस्यत्व घेऊ शकतील. याशिवाय नवीन सॉफ्टवेअर अपडेट आयक्लॉड शेअर्ड फोटो लायब्ररीसाठी सपोर्टसह येईल. याचा अर्थ तुम्ही तुमचा फोटो जास्तीत जास्त पाच इतर लोकांसोबत शेअर करू शकाल, ज्यांना फोटो एडिट करण्याचा आणि लायब्ररीमधून काढून टाकण्याचा देखील एक्सेस असेल.

apple set to roll out ios 16.1 update on oct 24 know its features and details
Prepaid Plans: स्वस्तातले रिचार्ज प्लॅन शोधताय? हे आहेत Airel, Jio अन् Vi चे बेस्ट पर्याय

दुसरीकडे, iOS 16.1 मध्ये, तुम्हाला कॉपी-पेस्ट फंक्सनॅलिटीवर डिप कंट्रोल मिळेल. म्हणजेच, जर तुम्हाला इतर अॅप्समधील कंटेन्ट पेस्ट करायचा असेल, तर तुम्ही अॅप प्रत्येक वेळी तुमची परवानगी मागते. आता तुम्ही त्याला कायम परवानगी देऊ शकता किंवा तुम्ही ते नाकारू शकता. तसेच, नवीन अपडेटमध्ये, लाइव्ह अॅक्टिव्हिटी, लाईव्ह ट्रॅकिंग फीचर आणि चार्जिंगमध्ये अपडेट दिसतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.