Apple Watch Saves Life of Woman Mid Flight : आजकाल टेक्नॉलॉजी एवढी प्रगत झाली आहे, की छोटे-छोटे गॅजेट्स देखील भरपूर कामाचे झाले आहेत. अॅपलच्या आयफोन आणि स्मार्ट वॉचने आतापर्यंत कित्येक जणांचे जीव वाचवले आहेत. आता ब्रिटनमधील एका महिलेचा जीवही अशाच प्रकारे वाचल्याचं समोर आलं आहे.
ही महिला ब्रिटनमधून इटलीला जात होती. यावेळी चालू फ्लाईटमध्येच तिची तब्येत अचानक खालावली. हजारो किलोमीटर उंचीवर विमान असताना या महिलेला श्वास घेण्यास अडचण येऊ लागली होती. यावेळी विमानातून एक डॉक्टर देखील प्रवास करत होते. (Smartwatch Saves Life)
या डॉक्टरांनी पाहिलं की महिलेच्या हातात अॅपल वॉच आहे. त्यांनी या स्मार्टवॉचच्या मदतीने महिलेचं हार्ट रेट, ब्लड ऑक्सिजन लेव्हल अशा गोष्टी तपासल्या. याव्यतिरिक्त अॅपल वॉचच्या मदतीने डॉक्टरांना या महिलेची मेडिकल हिस्ट्री देखील समजली. ही महिला हार्ट पेशंट असल्याचंही यामुळे समजलं. (Apple Watch Medical history)
यानंतर डॉक्टरांनी फ्लाईट क्रूला याबाबत माहिती दिली. या महिलेला तातडीने उपचारांची गरज असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं. सोबतच तिच्यासाठी ऑक्सिजन सिलेंडरही मागवण्यात आला. यानंतर परिस्थितीचं गांभीर्य ओळखून या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. यादरम्यान ऑक्सिजन सिलेंडर आणि अॅपल वॉचचं ट्रॅकिंग याच्या मदतीने महिलेच्या शरीरातील ऑक्सिजन लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवण्यात आली.
अॅपल वॉचने एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवल्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी एका महिलेच्या रक्तातील गाठ ओळखून अॅपल वॉचने अलर्ट दिला होता. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, आणि तिचा जीव वाचला. तसंच आणखी एका तरुणाचा जीवही अॅपलच्या आयफोनमधील अॅक्सिडेंट अलर्ट फीचरमुळे वाचला असल्याचं यापूर्वी समोर आलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.