‘ॲप’निंग : ‘टेलिग्राम’ है ना !

Appning
Appning
Updated on

‘कोरोना’च्या फैलावामुळे केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात लॉकडाउनची परिस्थिती आहे. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून डॉक्‍टर, आरोग्य कर्मचारी, पोलिस आणि अत्यावश्‍यक सेवा पुरवणाऱ्या क्षेत्रांतील काहींचा अपवाद वगळता सर्वजण घरातच आहेत. आपल्यापैकी काहीजण ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत, तर अनेकजणांकडे सध्या बराच मोकळा वेळ आहे. अनेकजण सोशल मीडियाचा आधार घेत आहेत. अशाच एका सोशल मीडिया ॲपबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

पूर्वीच्या काळी तार नावाचा प्रकार संदेश पाठविण्यासाठी वापरला जात होता, असे आपण ऐकून आहोत. काहीकाळ ही तारयंत्रणा कालबाह्य झाली होती. मात्र, या कालबाह्य यंत्रणेने कात टाकली आणि या डिजिटल युगाशी एकरूप होत नवा अवतार धारण केला. तो ‘टेलिग्राम’ म्हणून नावारूपाला आला आहे. आपल्यापैकी अनेकजण ‘टेलिग्राम’ वापरत असतील. मात्र, या लॉकडाउनच्या काळात ‘टेलिग्राम’ वापरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्याला कारणही तसेच आहे, कारण या ॲपची वैशिष्ट्ये आणि या ॲपमध्ये असलेल्या सुविधाही अनेकांची गरज भागवू शकतात.

घरी बसून अनेकजण कंटाळतात. समाजमाध्यमांवर तशा चर्चा होत आहेत. मात्र, यावर काहींनी उपाय शोधून काढत ‘टेलिग्राम’ला जवळ केले आहे. डेटा सिक्‍युरिटी, एकाचवेळी २० हजार जणांना ग्रुपमध्ये चॅटिंग करण्याची सोय आणि मोठ्या आकाराच्या फाईल देवाण-घेवाण करण्याची सुविधा असल्याने लॉकडाउनमध्ये ‘टेलिग्राम’ वापरकर्त्यांची संख्या वाढली. ‘टेलिग्राम’ जेव्हा ‘गुगल प्ले स्टोर’वर उपलब्ध करून दिले, तेव्हा पहिल्या तीन दिवसांत १० लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी ते डाउनलोड केले होते.

लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांना घरी अभ्यास करता यावा, यासाठी लेक्‍चरचे व्हिडिओ, जे चित्रपटरसिक आहेत त्यांच्यासाठी सर्व भाषांमधील लघुपट, चित्रपट, माहितीपटही ‘टेलिग्राम’च्या चॅनेलवर उपलब्ध आहेत. तसेच वेबसीरीजचे सीझनप्रमाणे भागही डाऊनलोड करण्याची मुभा ‘टेलिग्राम’ने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी कोणतेही वेगळे शुल्क आकारले जात नाही.  

निकोलाय आणि पॅवेल डुरोव्ह या रशियन भावंडांनी २०१३ मध्ये ‘टेलिग्राम’चा शोध लावला. सुरक्षित आणि वापरायला सोपे अशा ॲपच्या ते शोधात असताना त्यांना ‘टेलिग्राम’चा शोध लागला. ‘कोंताक्‍चे’ या रशियन सोशल नेटवर्किंगने ‘टेलिग्राम’ बाजारात आणले. आयफोन आणि अँड्रॉइड या दोन्ही फॉरमॅटमध्येही ‘टेलिग्राम’ उपलब्ध असून, लवकरच ते विंडोजवर येणार असल्याचे बोलले जाते. सुमारे ४० कोटीहून अधिक लोक ‘टेलिग्राम’चा वापर करत आहेत.दिवसेंदिवस ’टेलिग्राम’चे वापरकर्ते वाढत आहेत. त्यामुळे लवकरच ‘टेलिग्राम’ ‘व्हॉट्‌सॲप’ला मागे टाकण्याची आहे. लॉकडाउनच्या काळात घरी बसून थोडा अवघडलेपणा आला असेल, तर ‘टेलिग्राम’ला भेट द्या आणि हवे ते सर्च करा. ‘टेलिग्राम’मुळे लॉकडाउन कालावधी नक्कीच आनंददायी जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.