'AI'मुळे बदलतय जग ! युजर्सला होतोय फायदा, 'या' गोष्टीत दिसतेय लक्षणीय वाढ

स्मार्टफोनमुळे इंटरनेट आज सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. त्यातच आता एआयची भर पडल्याने संथगतीने होणारी सामान्यांची कामेही वेगाने होत असून एआयमुळे होणाऱ्या बदलांचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत.
'AI'मुळे बदलतय जग ! युजर्सला होतोय फायदा, 'या' गोष्टीत दिसतेय लक्षणीय वाढ
Updated on

AI Technology: आर्टिफिशियल इंटेलिजन्सने (एआय, कृत्रिम बुद्धिमत्ता) खरोखरच इंटरनेट सर्चिंगच्या जगाला अनेक महत्त्वपूर्ण मार्गांनी बदलले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सने इंटरनेट सर्चिंगची कार्यक्षमता, अचूकतेला प्राथमिक अनुभवात लक्षणीयरित्या अद्ययावत केले आहे. यामुळे, एआय आपल्या डिजिटल जीवनाचा एक मूलभूत भाग बनले आहे. गुगल सर्चिंगच्या दुनियेत हा मोठा बदल झाला आहे. जागतिक इंटरनेट दिनानिमित्त इंटरनेट जगतातील एआयच्या शिरकावामुळे झालेल्या बदलांचा आढावा घेण्यात आला.

स्मार्टफोनमुळे इंटरनेट आज सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. त्यातच आता एआयची भर पडल्याने संथगतीने होणारी सामान्यांची कामेही वेगाने होत असून एआयमुळे होणाऱ्या बदलांचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. येत्या काळात हे बदल समाजजीवनावरही बदल होणार आहे.

व्हॉइस सर्च

सिरी, गुगल असिस्टंट आणि अलेक्सा सारख्या व्हर्च्युअल असिस्टंटमुळे आवाजासह शोध वाढत्या प्रमाणात लोकप्रिय झाला आहे. या तंत्रज्ञानात एआय केंद्रस्थानी आहे. एआयमुळे बोलली जाणारी भाषा समजण्यास आणि सर्चिंगचे अचूक परिणाम मिळतात.

सल्ल्यांमुळे सर्च करणे सोपे

सर्च करताना एआयचा आधार असल्यामुळे टाइप करण्याचे परिश्रम अत्यंत कमी लागत आहेत. सर्च करताना शब्द सुचविल्या जात असल्याने सर्च प्रक्रिया जलद आणि वापरकत्यासाठी अधिक अनुकूल बनते. एआयमुळे सर्च इंजिन वापरकर्त्याला हवे असलेल्या गोष्टी अन्‌ ट्रेंडिंग विषयांवर आधारित अंदाज बांधून सर्चिंगचे निकाल देऊ शकतात.(Latest Marathi News)a

'AI'मुळे बदलतय जग ! युजर्सला होतोय फायदा, 'या' गोष्टीत दिसतेय लक्षणीय वाढ
धक्कादायक ! उमरखेडमध्ये चालत्या बसमधून ७३ प्रवाशांना उतरवून बसला लावली आग, ५ ते ६ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

फोटो, व्हिडीओचा शोध

एआयने उत्तम फोटो आणि व्हिडीओ शोधण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले आहे. शोध इंजिन आता फोटो आणि व्हिडीओ ओळखून त्यांचे वर्गीकरणही करू शकतात. हे विशेषतः ई-कॉमर्स आणि व्हिज्युअल कंटेंट प्लॅटफॉर्मसाठी उपयुक्त आहे.

सर्चिंगचा सुधारला अल्गोरिदम

एआय आणि मशिन लर्निंगने सर्व सर्च इंजिनला अधिक प्रगत आणि अत्याधुनिक अल्गोरिदम विकसित करण्यास सक्षम केले आहे. गुगलसारखी सर्च इंजिने वापरकर्त्याचा हेतू समजून घेण्यासाठी आणि संबंधित सर्चचे निकाल अधिक परिणामकारक करण्यासाठी एआय वापरतात.

नैसर्गिक भाषा प्रक्रिया (एनएलपी)

एनएलपी संगणक आणि मानवी भाषा यांच्यातील परस्पर संवादावर लक्ष केंद्रित करते. मानवी भाषेतील बारकावे अधिक चांगल्याने समजून घेण्यासाठी आणि आपल्या सर्चचे परिणाम अधिक अचूक देण्यासाठी सर्च इंजिन आता एनएलपी वापरतात. यामुळेच सिरी, गुगल असिस्टंट आणि अलेक्सा सारख्या आवाजासह सक्रिय सर्च साधनांचा विकास झाला आहे. (Latest Marathi News)

'AI'मुळे बदलतय जग ! युजर्सला होतोय फायदा, 'या' गोष्टीत दिसतेय लक्षणीय वाढ
Shivsena MLA Disqualification Case: आमदार अपात्रतेबाबत हालचालींना वेग! सुधारित वेळापत्रक उद्या सादर होणार? आज राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.