अशोक लेलँडने (Ashok Leyland) आज इकोमेट स्टार (Ecomet Star ICV) सीएनजी (CNG) ट्रक रेंज लाँच केली आहे. हे 16.1T आणि 14.250T GVW चे 2 पर्याय आणि 3 CNG सिलेंडर पर्यायांसह बाजारात लॉन्च केले गेले आहे. नवीन रेंजसोबत कंपनी 4 वर्षे किंवा 4 लाख किलोमीटरची वॉरंटीही देत आहे. हा सीएनजी ट्रक (Truck) प्रगत डिजिटल ड्रायव्हर डॅशबोर्डसह येतो.यासोबतच रात्रीच्या वेळी सुरक्षेसाठी शक्तिशाली राउंड हेड लॅम्प देण्यात आले आहेत. सुधारित मायलेज, दीर्घ काळ टिकणारे टायर्स, कमी देखभाल खर्च इत्यादीमुळे हे ट्रक मालकांसाठी फायदेशीर ठरू शकतात. (Ashok Leyland launches CNG truck range e-Comet Star)
अशोक लेलँडचे मध्यम आणि अवजड वाहनांचे प्रमुख संजीव कुमार यांनी या प्रसंगी सांगितले की, “इंटरमीडिएट कमर्शिअल व्हेईकल सीएनजी सेगमेंटच्या मागणीत झालेली वाढ लक्षात घेऊन आम्ही आमच्या अत्यंत यशस्वी ई-कॉमेट प्लॅटफॉर्मवर आधारित सीएनजी ट्रकची पहिली श्रेणी सुरू केली आहे. जसजसे आम्ही गतिशीलतेकडे वाटचाल करत आहोत, तसतसे आमच्या ग्राहकांच्या गरजाही समोर येत आहेत.
संजीव कुमार म्हणाले की ही सीएनजी श्रेणी सुरक्षित, इंधन कार्यक्षम आणि खर्चाच्या बाबतीतही मालकांना फायदेशीर ठरू शकते. ही नवीन श्रेणी आमचा पोर्टफोलिओ आणखी मजबूत करेल, ज्यामुळे आम्हाला झपाट्याने वाढणाऱ्या CNG वाहनांच्या बाजारातील आमचा वाटा सुधारता येईल आणि जागतिक स्तरावर शीर्ष 10 व्यावसायिक वाहन उत्पादकांपैकी एक होण्याच्या आमच्या व्हिजनला मदत मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.