Astronomical : ऑक्टोबरमध्ये दोन ग्रहणे, दोन उल्का वर्षाव ; खगोलप्रेमींसाठी आकाशातील घडामोडींची रेलचेल

सूर्यमालेतील सर्वात सुंदर आणि वलयांकित ग्रह शनी हा रात्रीच्या प्रारंभी ते पहाटेपर्यंत पूर्वेकडून पश्चिमेकडे दर्शन देत आहे.
lunar eclipse
lunar eclipsesakal
Updated on

अकोला - मोसमी वारे परतीला लागल्यानंतर आकाश निरीक्षण करणे अधिक सोयीचे होते. अशा वातावरणातच ऑक्टोबरमध्ये सूर्य व चंद्र अशी दोन ग्रहणे, दोन उल्का वर्षाव, ग्रहांच्या चंद्र व ताऱ्यांसोबत युती, ग्रहांचे उदयास्त आदींची रेलचेल खगोलप्रेमींसाठी असेल, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी दिली आहे.

पृथ्वीवरून पाच ग्रह, पाऊणेपाच हजार तारे आणि ८८ तारका समूह साध्या डोळ्यांनी सहज पाहू शकतो. सध्या स्थितीत गुरु, शुक्र आणि शनी हे तीन महाग्रह आकाशात अतिशय विलोभनीय दर्शन देत आहेत. महिन्याच्या प्रारंभी बुध कन्या राशीत व शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल. ता. ३ ऑक्टोबर रोजी मंगळ ग्रहाचा पश्चिमेस अस्त,

ता.६ ऑक्टोबरला रात्री ७ वा. इंटर नॅशनल स्पेसस्टेशन दर्शन, ता.७ ऑक्टोबरला बुध ग्रहाचा पूर्वेकडे अस्त होत आहे. ता.७, ८ व ९ रोजी रात्री ड्रेक्रोनिड तारका समूहातून आणि ता.२१, २२ रोजी मृग नक्षत्र समुहातून दरताशी वीस एवढ्या उल्का पडताना दिसतील. ता.१४ ऑक्टोबरला कंकणाकृती सूर्य ग्रहण आहे; पण भारतात ते दिसणार नाही. परंतू ता. २८ रोजी मध्यरात्री नंतर होणारे खंडग्रास चंद्रग्रहण सुमारे सव्वा तास बघता येईल.

lunar eclipse
Solapur : ऊसापासुन इथेनॉल निर्मिती करणार ; हंगामात साडे सहा लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्दीष्ट - विश्वराज महाडिक

शनी दर्शनाचा योग

सूर्यमालेतील सर्वात सुंदर आणि वलयांकित ग्रह शनी हा रात्रीच्या प्रारंभी ते पहाटेपर्यंत पूर्वेकडून पश्चिमेकडे दर्शन देत आहे. शनी ग्रह सध्या कुंभ राशी समूहात आहे. त्यानंतर रात्री साडे आठनंतर पूर्व क्षितिजावरच सूर्यमालेतील सर्वात मोठा असलेला गुरू ग्रह हा आपल्याला अगदी ठळकपणे पहाटेपर्यंत पाहता येईल.

lunar eclipse
Nanded News : तिसरे अपत्य सिद्ध झाल्याने सदस्यत्व रद्द; मेदनकल्लूर प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

त्यानंतर पहाटेच्या निवांत वेळी पूर्व क्षितिजावर अधिराज्य गाजवणारा शुक्र ग्रह चांगल्यापैकी बघता येईल. या तिन्ही ग्रहांचे दुर्बिणीतून दर्शन केल्यास शनी ग्रहाचे सुंदर वलय, आणि गुरू ग्रहाचे चार चंद्र चांगल्यापैकी पाहता येतील. पहाटेच्या वेळी शुक्र ग्रहाच्या चंद्रासारख्या कला बघता येतील. असा हा अनोखा आकाश नजारा प्रत्येकाने आपल्या डोळ्यात साठवून घ्यावा, असे आवाहन प्रभाकर दोड यांनी केले आहे.

lunar eclipse
Nagpur News : उपराजधानीत दोन ठिकाणी आग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()