Asus 8z भारतात लॉंच; मिळेल 64MP कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर अन् बरंच

asus 8z launched in india know price and specifications
asus 8z launched in india know price and specifications
Updated on

Asus ने आपला नवीन स्मार्टफोन Asus 8z भारतात लॉंच केला आहे. कंपनीचा हा लेटेस्ट स्मार्टफोन सिंगल व्हेरियंट 8GB + 128GB मध्ये येतो. फोनची किंमत 42,999 रुपये असून होरायझन सिल्व्हर आणि ऑब्सिडियन ब्लॅक कलर पर्यायांमध्ये येत असलेल्या, या फोनची विक्री फ्लिपकार्टवर 7 मार्च रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल. फोनमध्ये, कंपनी स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर, 30 डब्ल्यू फास्ट चार्जिंग आणि 64 मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेरासह अनेक दमदार फीचर्स देत आहे. चला जाणून घेऊया डिटेल्स.

Asus 8z चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्समध्ये कंपनीने 1080x2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 5.9-इंचाचा फुल HD + Samsung E4 AMOLED डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 20:9 च्या आस्पेक्ट रेशो आणि 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शनने सुसज्ज आहे. Asus या फोनमध्ये 8 GB LPDDR5 RAM आणि 128 GB UFS 3.1 स्टोरेज देत आहे.

asus 8z launched in india know price and specifications
शिवराय आणि रामदासांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही - सुप्रिया सुळे

प्रोसेसर म्हणून तुम्हाला या फोनमध्ये Snapdragon 888 चिपसेट पाहायला मिळेल. फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देत आहे. यात 64-मेगापिक्सेल प्रायमरी लेन्ससह 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आहे. त्याच वेळी, कंपनी सेल्फीसाठी या फोनमध्ये 12-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.

अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये तुम्हाला 4000mAh बॅटरी मिळेल. ही बॅटरी 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी तुम्हाला या फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.2, USB Type-C आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखे पर्याय मिळतील.

asus 8z launched in india know price and specifications
बापरे! युट्यूब बघून फार्मसी विद्यार्थ्यांनी केली लिंगबदल शस्त्रक्रिया; एकाचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.