Ather Rizta : एथरने लाँच केली नवी 'फॅमिली स्कूटर', सिंगल चार्जमध्ये धावेल 165 किलोमीटर; किंमतही परवडणारी

Ather Family Scooter : कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही एक प्रॅक्टिकल स्कूटर आहे. यामध्ये भरपूर स्पेस आणि कंफर्ट यावर विशेष लक्ष देण्यात आलं आहे.
Ather Rizta video
Ather Rizta videoeSakal
Updated on

Ather Rizta Price and Features : देशातील अग्रगण्य इलेक्ट्रिक स्कूटर निर्माती कंपनी एथर गेल्या काही दिवसांपासून शांत होती. अखेर कंपनीने बऱ्याच काळानंतर आपली नवी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. 'रिझ्टा' असं नाव असणारी ही एक फॅमिली स्कूटर आहे. याची किंमत 1.10 लाख रुपयांपासून सुरू होते.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही एक प्रॅक्टिकल स्कूटर आहे. यामध्ये भरपूर स्पेस आणि कंफर्ट यावर विशेष लक्ष देण्यात आलं आहे. आरामदायक राईडसाठी यामध्ये मोठं सीट दिलं आहे. तर फ्रंट आणि अंडरसीट स्टोरेज मिळून एकूण 56 लीटरचा स्टोरेज स्पेस मिळतो. यामध्ये इतरही बरेच फीचर्स देण्यात आले आहेत. (Ather Electric Scooter)

दोन व्हेरियंट केले लाँच

Ather Ritza चे दोन व्हेरियंट लाँच करण्यात आले आहेत. यातील एका व्हेरियंटमध्ये 2.9kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. याची रेंज सुमारे 123 किलोमीटर आहे. दुसऱ्या व्हेरियंटमध्ये 3.7kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. याची रेंज 165 किलोमीटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या दोन्ही व्हेरियंटचा टॉप स्पीड 80 kmph असल्याचं कंपनीने सांगितलं आहे.

Ather Rizta video
Emotorad : कशी आहे धोनीने जाहिरात केलेली इलेक्ट्रिक सायकल? किती आहे किंमत? जाणून घ्या

फीचर्स अन् किंमत

या स्कूटरची सुरुवातीची किंमत (Ather Rizta Price) 1.10 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. याच्या टॉप व्हेरियंटची किंमत 1.45 लाख रुपये आहे. टॉप एंड व्हर्जनमध्ये TFT डिस्प्ले मिळतो. तसंच यामध्ये दोन रायडिंग मोड्स देण्यात आले आहेत. यासोबतच 5 वर्षांची वॉरंटी, IP67 रेटिंग आणि 400mm वॉटर व्हेंडिंग कपॅसिटी, मल्टिपर्पज चार्जर, इनबिल्ट गुगल मॅप्स, ट्रॅक्शन कंट्रोल असे फीचर्सही या स्कूटरमध्ये दिले आहेत. (Ather Rizta Features)

या स्कूटरच्या किंमती इंट्रोडक्टरी आहेत, भविष्यात त्या वाढण्याची शक्यता असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. ही स्कूटर तुम्ही एथरच्या अधिकृत शोरुम आणि वेबसाईटवरुन बुक करू शकता. याची डिलिव्हरी जुलै महिन्यापासून सुरू होणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे.

Ather Rizta video
Ola Solo : हा एप्रिल फूल जोक नाही! ओलाने खरंच तयार केली आपोआप चालणारी इलेक्ट्रिक स्कूटर; पाहा व्हिडिओ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.