Audi Q5 कार नवीन अवतारात, जाणून घ्या फिचर्स अन् किंमत

लक्झरी कार कंपनी ऑडी इंडियाने आपली Audi Q5 ला नव्या अवतारात लाँच केले आहे.
Audi Q5
Audi Q5esakal
Updated on

लक्झरी कार कंपनी Audi India ने आपली Audi Q5 ला नव्या अवतारात लाँच केले आहे. कंपनीने या कारमध्ये मनोरंजनाचा पूर्ण विचार केला आहे. याबरोबरच कंफर्ट आणि डिझाईनलाही नवीन टच दिले गेले आहे. यामुळे ही गाडी कार ना राहता मित्र किंवा कुटुंबासह मौजमस्ती करण्यासाठी चालते-फिरते पार्टी क्लब झाले आहे. जाणून घ्या फिचर्स आणि किंमत..

सर्वप्रथम नवीन ऑडी क्यू ५ च्या कामगिरी विषयी बोलू, यात कंपनीने २.० लीटरचे टीएफएसआय पेट्रोल इंजिन दिले आहे. जे २४९ बीएचपीचे कमाल पाॅवर आणि ३७० एनएमचे पीक टाॅर्क जेनरेट करते. ऑडी क्यू ५ फक्त ६.३ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग घेते. दुसरीकडे तिचे ड्रायव्ह डायनामिक्स, क्वाट्रो ऑल-व्हील ड्रायव्ह आणि डॅपर कंट्रोलसह सस्पेंशन तंत्रज्ञान २३७ किलोमीटरचे टाॅप स्पीड देते. ऑडी क्यू ५ च्या दिसण्याला नवीन रुप दिले गेले आहे. तिचे बंपरला रिडिझाईन केले गेले आहे. फ्रंटमध्ये ऑक्टागन आऊटलाईनसह ट्रेडमार्क सिंगल-फ्रेम ग्रिल आहे आणि त्यावर क्रोम फिनिशने प्रीमियम बनवते. या व्यतिरिक्त स्किड प्लेट्स, रुफ रेल्स आणि नवीन फाॅगलॅम्प केसिंगमध्ये सिल्व्हर एक्सेंट तिचे दिसणे आणखीन आकर्षक बनवते.

Audi Q5
Audi Q5esakal
Audi Q5
Mahindra लवकरच लाँच करु शकते नवी इलेक्ट्रिक SUV कार

ऑडी क्यू ५ पाच रंगांमध्ये उपलब्ध होईल. नव्हरा ब्लू, आयबीस व्हाईट, मायथोस ब्लॅक, फ्लोरेट सिल्व्हर आणि मॅनहॅट्टन ग्रे ही ती पाच रंग. दुसरीकडे कारमध्ये १९ इंचाचे एलॅाय व्हिल, रॅपराऊंड शोल्डर लाईन आणि एलईडी काॅम्बिनेशन लॅम्प सारखे फिचर्सही आहेत. नवीन ऑडी क्यू ५ चे इंटिरिअरला पियानो ब्लॅक फिनिश दिले गेले आहे. यात सेन्सरने चालणारे बूट लिड ऑपरेशन, पार्किंगमध्ये सहज लावण्यासाठी पार्क असिस्ट, ड्रायव्हर मेमेरीसह पाॅवर फ्रंट सीट्स आणि वायरलेस चार्जिंगचे फिचर्स आहे. कारमध्ये ३ झोन एअर कंडिशनिंगची सुविधा आहे. ३० रंगांचे एंबियंन लायटिंगही देण्यात आले आहे. नवीन ऑडी क्यू ५ हे चालता-फिरता पार्टी क्लब आहे. यात २५.६५ सेमीचे मल्टिमीडिया इन्फोटेनमेंट टचस्क्रिन आहे. जे एमआयबी ३ प्लॅटफाॅर्मवर काम करते. या व्यतिरिक्त यात व्हाॅईस कंट्रोल, अॅपल कारप्ले आणि अँड्राॅईड ऑटोचेही फिचर आहे. कारमध्ये जबरदस्त साऊंड सिस्टिम आहे. त्यात १९ स्पीकर आहेत, जे ३ डी साऊंड इफेक्ट निर्माण करतात.

किंमत

कंपनीने नवीन ऑडी क्यू ५ ला दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. यात ऑडी क्यू प्रिमियम प्लसची एक्स शोरुम किंमत ५८ लाख ९३ हजार रुपये आहे. ऑडी क्यू टेक्नाॅलाॅजीची किंमत ६३ लाख ७७ हजार रुपयांपासून सुरु होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()