Audi India : लग्झरी गाड्यांची मागणी वाढली; ऑडी इंडियाच्‍या विक्रीमध्‍ये ८८ टक्‍क्‍यांची मोठी वाढ

Luxury Cars : ऑडी इंडियाने यावर्षी आतापर्यंत ५,५३० युनिट्सची विक्री केली आहे.
Audi India Sale
Audi India SaleeSakal
Updated on

ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने आज या वर्षाच्‍या पहिल्‍या नऊमाहीत ५,५३० युनिट्सची विक्री करत विक्रीमध्‍ये ८८ टक्‍क्‍यांची वाढ केल्‍याची घोषणा केली आहे. यामुळे देशात आता लग्झरी गाड्यांची मागणी वाढल्याचं दिसून येत आहे.

नवीन ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉन, ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ई-ट्रॉन, ऑडी क्‍यू३ व ऑडी क्‍यू३ स्‍पोर्टबॅकच्‍या लाँचसह ऑडी ए४, ऑडी ए६, ऑडी क्‍यू५ आणि टॉप-ऑफ-द-लाइन कार्स ऑडी क्‍यू७, ऑडी क्‍यू८, ऑडी ए८ एल, ऑडी एस५ स्‍पोर्टबॅक, ऑडी आरएस५ स्‍पोर्टबॅक, ऑडी आरएस क्‍यू८, ऑडी ई-ट्रॉन जीटी व ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी यांच्‍यासाठी सतत होत असलेल्‍या मागणीमुळे सकारात्‍मक वाढ झाली आहे.

याच कालावधीमध्‍ये एसयूव्‍ही श्रेणीमध्‍ये मोठी १८७ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे आणि परफॉर्मन्स व लाइफस्‍टाइल कार्ससह ई-ट्रॉन श्रेणीमध्‍ये ४२ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्‍लों यांनी याबाबत माहिती दिली.

Audi India Sale
5 Cars Place In October : आत्ताच बजेटची तयारी करून ठेवा; कारण ऑक्टोबरमध्ये होणार आहे या 5 गाड्यांची एंट्री

"ऑडी इंडियाने ५,५३० युनिट्सची विक्री करत ८८ टक्क्यांच्‍या वाढीची नोंद केली. तसेच आमच्‍या एसयूव्‍हींमध्‍ये १८७ टक्‍क्‍यांची वाढ दिसली आहे. आगामी सणासुदीच्‍या काळासह आम्‍हाला आमच्‍या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्स जसे ऑडी ए४, ऑडी ए६, ऑडी क्‍यू३, ऑडी क्‍यू३ स्‍पोर्टबॅक, क्‍यू५, ऑडी क्‍यू७ व ऑडी क्‍यू८ साठी मागणी कायम राहण्‍यासह ही वाढ सुरू राहण्‍याची अपेक्षा आहे." असं ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "आमच्‍या नवीन लाँच करण्‍यात आलेल्‍या कार्स ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉन व ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ई-ट्रॉन (उद्योगामध्‍ये सर्वोत्तम असलेल्‍या प्रभावी ११४ केडब्ल्‍यूएच बॅटरीसह ऑफर करण्‍यात आलेली) यांसह आमचा विभागातील सर्वात मोठा ईव्‍ही पोर्टफोलिओ आहे. आम्‍हाला सणासुदीच्‍या काळादरम्‍यान आमच्‍या इलेक्ट्रिक श्रेणीसाठी उत्तम मागणी मिळण्‍याचा विश्‍वास आहे, ज्‍यामध्‍ये भारतातील पहिल्‍या ईव्‍ही सुपरकार्स - ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी यांचा देखील समावेश आहे."

Audi India Sale
Sunroof Car Drawbacks : Sunroof कारचे फायदे कमी अन् तोटेच जास्त, घेण्याआधी हजारवेळा विचार करा

"मोठी मागणी, लक्‍झरी कार विभागामधील विस्‍तारीकरण, सर्वसमावेशक डेमो‍ग्राफिक्‍स आणि अनुकूल आर्थिक स्थितींमुळे प्रबळ विक्री कामगिरी वाढीला साह्य करत आहे. आज, प्रत्‍येकी चारपैकी एक ग्राहक रिपीट ऑडी ग्राहक आहे, ज्‍यामधून आमच्‍या निदर्शनास येते की ग्राहक आनंदी आहेत. आम्‍ही विकासाच्‍या दिशेने वाटचाल करत आहोत, जेथे शाश्‍वतता, लाभदायी व्‍यवसाय आमचे धोरण आहे आणि आम्‍हाला उच्‍च दोन-अंकी वाढीसह वर्षाची सांगता होण्‍याची अपेक्षा आहे." अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

जानेवारी ते सप्‍टेंबर २०२३ कालावधीत ऑडी अप्रूव्‍ह्ड: प्‍लस (पूर्व-मालकीचा कार व्‍यवसाय) ६३ टक्‍क्‍यांनी वाढला. ऑडी इंडियाने भारतातील आपला पूर्व-मालकीचा कार व्‍यवसाय ऑडी अप्रूव्‍ह्ड: प्‍लसचे विस्‍तारीकरण सुरू ठेवले आहे. सध्‍या देशातील सर्व प्रमुख ठिकाणी २५ ऑडी अप्रूव्‍ह्ड: प्‍लस सुविधांसह कार्यरत असलेला ब्रॅण्‍ड विस्‍तार करत आहे आणि २०२३ च्‍या अखेरपर्यात २७ पूर्व-मालकीच्‍या कार सुविधा असतील.

इलेक्ट्रिफिकेशन धोरणाला अधिक पुढे नेत ऑडी इंडियाने नुकतेच ईव्‍ही मालकांसाठी उद्योगातील पहिला उपक्रम - ‘मायऑडीकनेक्‍ट’ अॅपवर ‘चार्ज माय ऑडी’ची घोषणा केली. हे एक-थांबा सोल्‍यूशन आहे, जे ऑडी ई-ट्रॉन ग्राहकांना एकाच अॅपवर विविध इलेक्ट्रिक वेईकल चार्जिंग सहयोगींची माहिती देते. सध्‍या ‘चार्ज माय ऑडी’वर ऑडी ई-ट्रॉन मालकांसाठी १००० हून अधिक चार्ज पॉइण्‍ट्स उपलब्‍ध आहेत, ज्‍यामध्‍ये पुढील काही महिन्‍यांत अधिक भर होईल.

Audi India Sale
Car Offer : एक रुपयाही न भरता मिळेल ही हॅचबॅक कार; दहा हजारांपेक्षा कमी बसेल हप्ता! जाणून घ्या डीटेल्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.