नवी दिल्ली- अवकाशात जाण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. सध्या फक्त वैज्ञानिकांचं अवकाशात जाण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे. वैज्ञानिक अवकाशात जाऊन अनेक प्रयोग करत असतात. माणसाला अवकाशात वस्ती करण्यास शक्य होईल काय? याचा ते शोध घेत असतात. अवकाशात जाण्याचा अनुभव नक्कीच अवर्णनीय असणार आहे.
याच संदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक ऑस्ट्रेलियन अंतराळवीर अवकातून पृथ्वीवर उडी टाकत असल्याचं सांगण्यात आलं आहे. तब्बल 1,28,000 फूटावरून घेतलेली ही उडी आहे. इतक्या उंचीवरून पृथ्वी संपूर्ण दिसते. शास्त्रज्ञ 1236 किलोमीटरचे अंतर पार करून पृथ्वीवर उतरतो. पृथ्वीवर पोहोचण्यासाठी त्याला 4 मिनिट 5 सेकंदाचा वेळ लागला आहे, असं व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे.