Auto Bike : पावसाळा आला कि आपल्याला कार असणं गरजेचं वाटतं. यातलं मुख्य कारण म्हणजे पावसाळयात बाईक स्लिप होतात. पण चार चाकी गाड्यांचं तसं नसतं. त्यांच्यात ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम असं एक सेफ्टी फीचर असतं, ज्यामुळे टायर स्लिप होण्यापासून रोखते. टायर स्लिप होत असताना हे फीचर वेग कमी करते. कारमध्ये असलेलं हे फीचर्स आता बाइकमध्ये देण्यास सुरुवात झाली आहे. चला जाणून भारतातील अशाच पाच बाइकबाबत
Yamaha FZ-S V4 :ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम असलेली यामाहाची ही पहिली बाइक आहे. या बाइकची एक्स शोरुम किंमत 1,27,900 रुपये आहे.
Yamaha FZ-X : यामाहाच्या बाइकमध्येही ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम दिलं आहे. ही बाइक 149 सीसी सिंगल सिलेंडर एअर कूल इंजिन पॉवरसह येते. या बाइकची एक्स शोरुम किंमत 1,35,900 रुपये आहे.
Yamaha Aerox 155 : यामाहा एयरोक्स 155 ही बाइकही जबरदस्त फीचर्ससह येते. या बाइकमध्येही ट्रॅक्स कंट्रोल सिस्टम आहे. टीसीएस सिस्टमुळे ही स्कुटर आणखी सुरक्षित आहे. यात 155 सीसीचं इंजिन दिलं आहे. या बाइकची एक्स शोरुम किंमत 1,42,800 रुपये आहे.
Yamaha MT-15 V2 : या यादीत यामाहा एमटी 15 व्ही 2 या गाडीचा समावेश आहे. या गाडीची एक्स शोरुम किंमत 1,64,900 रुपये आहे. या बाइकमध्ये 155 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन असून 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते.
Yamaha R15 V4 : यामाहाच्या आर 15 व्ही 4 या बाइकमध्येही ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम आहे. या व्यतिरिक्त यात यूनी डायरेक्शनल क्विक शिफ्टरसारखे फीचर्सही आहेत.भारतात या गाडीची एक्स शोरुम किंमत 1,80,900 रुपये आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.