Auto Expo 2023: इलेक्ट्रिक कार्स मार्केट गाजवणार, बाजारात येणार 'या' ५ भन्नाट EV

ऑटोमोबाइल क्षेत्रातील सर्वात मोठा इव्हेंट Auto Expo 2023 उद्यापासून सुरू होणार आहे. या इव्हेंटमध्ये अनेक शानदार इलेक्ट्रिक कार्स लाँच होतील.
Auto Expo 2023
Auto Expo 2023Sakal
Updated on

Auto Expo 2023: ऑटो एक्स्पो २०२३ ला उद्यापासून सुरुवात होणार आहे. ११ जानेवारी ते १८ जानेवारी दरम्यान चालणाऱ्या या सेलमध्ये अनेक शानदार गाड्या लाँच होणार आहेत. या इव्हेंटमध्ये सादर होणाऱ्या इलेक्ट्रिक कार्सकडे विशेष लक्ष असेल.

इव्हेंटमध्ये सादर होणाऱ्या ५ इलेक्ट्रिक कार्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Auto Expo 2023
Smart TV Offer: आता मोठ्या स्क्रीनवर घ्या चित्रपटांचा आनंद, ५५ इंच Smart TV वर ८५ हजारांचा डिस्काउंट

Tata punch EV

या इव्हेंटमध्ये टाटा आपली नवीन इलेक्ट्रिक कार Tata punch EV ला सादर करणार आहे. ही इलेक्ट्रिक कार दोन बॅटरी पॅक पर्यायासह येईल. यातील एक बॅटरी मिडियम रेंज आणि दुसरी बॅटरी लाँग रेंजसह येईल. लाँग रेंज २६kWh बॅटरी पॅकसह येऊ शकते.

KIA EV 9

KIA ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये अपकमिंग EV9 मॉडेलला जास्त बॅटरी पॅकसह लाँच करू शकते. ह्युंडाईप्रमाणेच या कारमध्ये ७७.४kWh बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार, कार अवघ्या ५ सेकंदात ताशी ० ते १०० किमीचा वेग पकडते. सिंगल चार्जमध्ये कार सहज ५४० किमी अंतर पार करेल.

Maruti EV

मारुती सुझुकी या इव्हेंटमध्ये नवीन इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट एसयूव्हीला सादर करू शकते. गाडीचे कोडनेम YY8 आहे. या कॉन्सेप्ट कारसोबतच कंपनी ईव्ही सेगमेंटमध्ये एंट्री करण्याच्या तयारीत आहे.

मारुती YY8 एक ऑल-इलेक्ट्रिक मिड-साइज SUV आहे. या कारला टोयोटासोबत मिळून तयार करण्यात आले आहे. कारची लांबी ४.२ मीटरपेक्षा अधिक व व्हीलबेस २.७ मीटर असेल.

हेही वाचा: Smartphone Offer: पहिल्याच सेलमध्ये स्वस्तात मिळतोय POCO चा शानदार फोन, अवघ्या ५९९ रुपयात करा खरेदी

MG Air EV

MG Air EV आधीपासूनच चीनच्या बाजारात उपलब्ध आहे. त्यामुळे भारतात येणारे सिंगल-स्पीड ऑटोमेटिक मॉडेल ३०kW बॅटरी पॅक आणि ५०kW बॅटरी पॅकसह येईल.

५०kW बॅटरी पॅक ६७bhp पॉवर, तर ३०kW बॅटरी पॅक ४० बीएचपी पॉवर जनरेट करते. परदेशात मिळणारे मॉडेल २०० ते ३०० किमी रेंजसह येते.

Hyundai Ioniq5 EV

ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये Hyundai IONIQ 5 इलेक्ट्रिक कार सादर होणार आहे. या कारचे वैशिष्ट्ये म्हणजे अवघ्या १८ मिनिटात ८० टक्के चार्ज होईल.

हेही वाचा: योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.