Auto Expo 2023: रेट्रो लूकसह आली दमदार बाईक, फक्त २ हजारात करा बुक; Royal Enfield-TVS ला टक्कर

Keeway ने Auto Expo 2023 मध्ये आपल्या नवीन बाईकला लाँच केले आहे. या बाईकची किंमत जवळपास दीड लाख रुपये आहे.
Keeway SR 250
Keeway SR 250Sakal
Updated on

Keeway SR 250 Launched: Auto Expo 2023 ला सुरुवात झाली आहे. या इव्हेंटमध्ये बाइक निर्माता कंपनी Keeway ने आपली नवीन क्रूजर बाइक कीव्हे एसआर २५० (Keeway SR 250) ला लाँच केले आहे. ही बाइक रेट्रो डिझाइनसह येते. याआधी कंपनीने या बाईकचे एसआर १२५ मॉडेल देखील लाँच केले होते.

Keeway SR 250 ची किंमत

Keeway SR 250 ला भारतीय बाजारात १.४९ लाख रुपये किंमतीत लाँच करण्यात आले आहे. ही बाईक Kawasaki W175, TVS Ronin आणि Royal Enfield Hunter 350 ला टक्कर देईल.

तुम्ही या रेट्रो डिझाइनसह येणाऱ्या बाईकला २ हजार रुपये देऊन बुक करू शकता. बाईकची विक्री एप्रिल २०२३ पासून सुरू होईल.

Keeway SR 250
Flipkart Sale: सुरू होतोय फ्लिपकार्टचा भन्नाट सेल, टीव्ही-फ्रिज निम्म्या किंमतीत; iPhone खूपच स्वस्तात

Keeway SR 250 चे इंजिन आणि फीचर्स

Keeway SR250 मध्ये कंपनीने सिंगल सिलेंडर २२३ सीसीचे इंजिन देण्यात आले असून, हे एअर कूल्ड टेक्नोलॉजीवर आधारित आहे. इंजिन १६ एचपी पॉवर आणि १६ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५ स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशनसह येते.

हेही वाचा: Auto Expo 2023 : मारुतीची पहिली इलेक्ट्रिक SUV लाँच; बाजारात कधी येणार? वाचा

ब्रेकिंग सिस्टमबद्दल सांगायचे तर याच्या फ्रंट व्हीलमध्ये ३०० एमएमचे डिस्क ब्रेक आणि रियर व्हीलमध्ये २१० एमएमचा डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. तसेच, सिंगल चॅनेल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम देखील मिळेल.

बाईकमध्ये डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, ऑल एलईडी लाइटिंग, सिंगल पीस सीट, राउंड शेप हेड लाइट सारखे फीचर्स दिले आहेत.

हेही वाचा: गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.