Auto Expo 2023: जानेवारी महिन्यात Auto Expo 2023 इव्हेंट पार पडणार आहे. ऑटोमोबाइल क्षेत्रातील सर्वात मोठ्या इव्हेंटपैकी हा एक आहे. या इव्हेंटमध्ये ऑटोमोबाइल कंपनी Maruti Suzuki आपल्या नवीन कार्सला सादर करणार आहे. कंपनी नवीन इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट एसयूव्ही आणि दोन नवीन एसयूव्ही मॉडेल्सला सादर करेल.
Maruti Suzuki India Limited चे मॅनेजिंग डायरेक्ट आणि सीईओ Hisashi Takeuchi यांनी माहिती दिली की, मारुती सुझुकी ४ दशकांपासून इंडस्ट्रीमधील सर्वोत्तम प्रोडक्ट सादर करत आहोत. Auto Expo’23 ही आमच्यासाठी आणखी एक संधी असेल, जेथे आम्हाला भविष्यातील चांगल्या वाहनांना सादर करता येईल.
हेही वाचा: असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...
कंपनी ऑटो एक्सपोमध्ये YY8 या कोडनेमने इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट एसयूव्हीला सादर करणार आहे. ही गाडी Hyundai Creta च्या डिझाइनपासून प्रेरित असण्याची शक्यता आहे. कंपनी २०२५ मध्ये या गाडीला लाँच करेल. गाडीची रेंज ५०० किमी असू शकते. जवळपास १३ लाख रुपयांच्या बजेटमध्ये येणारी ही कार कंपनीची भारतातील पहिले इलेक्ट्रिक मॉडेल असेल.
कंपनी या अपकमिंग इव्हेंटमध्ये दोन नवीन एसयूव्हींना देखील सादर करेल. यामध्ये Baleno वर आधारित एसयूव्ही आणि Jimny 5-door SUV चा समावेश आहे. याशिवाय, Wagon R चे फ्लेक्स-फ्यूल मॉडेल देखील इव्हेंटमध्ये सादर होऊ शकते. कंपनीने माहिती दिली की, जवळपास १६ नवीन व्हीकल्सला सादर केले जाईल. इव्हेंटमध्ये Grand Vitara, XL6, Ciaz, Ertiga, Brezza, Baleno, आणि Swift चे नवीन मॉडेल देखील पाहायला मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.