Auto Expo 2023 : आता पाय घासत गाडी चालवण्याची गरज नाही, ही ईव्ही स्कूटर बनणार वृद्धांचा आधार

ऑटो एक्स्पो 2023 मध्ये प्रगत तंत्रज्ञानासह येणारी वाहने पाहायला मिळत आहेत
Auto Expo 2023
Auto Expo 2023esakal
Updated on

Auto Expo 2023 : ऑटो एक्स्पो 2023 मध्ये प्रगत तंत्रज्ञानासह येणारी वाहने पाहायला मिळत आहेत. दरम्यान, वृद्धांचा आधार आणि दिव्यांगांचे बळ देणारी अशी स्कूटर एक्स्पोमध्ये लॉंच झाली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर चालवताना तुम्हाला जमिनीवर पाय ठेवण्याची गरज नाही. तुम्हाला याचा बॅलन्स साधण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न करावे लागणार नाहीत, होय ही स्कूटर ऑटो बॅलेंसिंग तंत्रासह येईल .

Auto Expo 2023
Chutney Batata Recipe : तिच तिच भाजी पोळी खाऊन कंटाळा आलाय? ट्राय करा चटपटीत चटणी बटाटा रेसिपी

आजच्या काळात एकापेक्षा एक उत्तम स्कूटर पाहायला मिळतात. मात्र त्यामध्ये वृद्ध आणि अपंगांसाठी फार कमी वाहने येतात. अशा परिस्थितीत ही ऑटो बॅलन्सिंग स्कूटर या दोघांसाठी खूप प्रभावी ठरू शकते.

Auto Expo 2023
Bill Gates Phone : स्वतःच्या Microsoft कंपनीचा फोन वापरत नाही बिल गेट्स, कारण आहे खास

पहिली ऑटो बॅलेंसिंग इलेक्ट्रिक स्कूटर Liger X

वृद्ध आणि अपंगांसाठी स्कूटर बॅलेन्स करणे किंवा थांबवणे खूप आव्हानात्मक असल्याचे अनेकदा दिसून येते. अनेकदा असे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात, ज्यामध्ये स्कूटर हाताळता न आल्याने अपघात होतात. अशा परिस्थितीत, या लोकांना स्कूटरचा तोल सांभाळावा लागणार नाही आणि उत्तम राईडचा अनुभवही मिळेल हे छान होईल.

Auto Expo 2023
Travel Tips : क्रूर प्राण्यांनी गजबलेलं बेट, जेवण सुद्धा हेलिकॉप्टरने पोहचवावं लागतं

अशा परिस्थितीत वृद्ध आणि दिव्यांगांसाठी ही एक उत्तम ऑफर ठरू शकते. मुंबईस्थित स्टार्टअप लिगर मोबिलिटी कंपनीने या ऑटो एक्स्पोमध्ये जगातील पहिली ऑटो-बॅलन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर Liger X सादर केली आहे. ही स्कूटर पूर्णपणे मेड-इन-इंडिया असून लवकरच ती विक्रीसाठी लाँच केली जाईल.

Auto Expo 2023
Vastu Tips : घरात या दिशेला ठेवा लक्ष्मीचा फोटो, धनसंपत्तीने भरेल घर

ऑटो बॅलेन्स तंत्रज्ञान कसे कार्य करते

कंपनी गेल्या 6 वर्षांपासून या स्कूटर आणि तंत्रज्ञानावर काम करत आहे. या स्कूटरमध्ये ऑटो बॅलेंसिंग तंत्र वापरण्यात आले आहे, जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI आधारित तंत्र आहे. हे तंत्रज्ञान भौतिकशास्त्राच्या गायरोस्कोपिक तत्त्वावर कार्य करते. यामुळे सेन्सरच्या मदतीने स्कूटर आपल्या जागी स्थिर राहते. यामध्ये दिलेले सेन्सर्स स्कूटरच्या आजूबाजूचा सर्व डेटा गोळा करतात आणि AI त्यावर प्रक्रिया करते.

Auto Expo 2023
Veerappan Death : वीरप्पनला पकडण्यासाठी केलेला बद्दल दोन अब्ज खर्च! असा रचलेला सापळा..

स्कूटरला स्टँड लागेल की नाही?

आता या आगामी स्कूटरमध्ये साइड स्टँड दिला जाईल की नाही हा प्रश्न बहुतेकांना पडला असेल, पण तसं नाही आहे. ही ऑटो-बॅलन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर साइड स्टँडसह येईल. कंपनीने सांगितले आहे की या स्कूटरमधील ऑटो बॅलेंसिंग तंत्र स्लो-स्पीडसाठी आहे. स्कूटर जास्त वेगात असताना स्वतःच तोल सांभाळते. पण हे तंत्र तेव्हाच काम करते जेव्हा स्कूटर चालू असते आणि त्याचे सेन्सर्सही सक्रिय असतात. स्कूटर बंद असेल तर ती उभी ठेवण्यासाठी बाजूला किंवा मुख्य स्टँड आवश्यक आहे.

Auto Expo 2023
Travel In Pune : पुण्यातल्या पुण्यातच विकेंड प्लॅन करायचा आहे? मग पू.ल देशपांडे उद्यान आहे बेस्ट

म्हणूनच वृद्ध आणि अपंगांसाठी ते फायदेशीर आहे

वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींना स्कूटर रस्त्यावरून चालवताना कमी वेगाने किंवा खडबडीत रस्त्यावर स्कूटरचा समतोल राखणे कठीण जाते किंवा स्कूटी थांबवण्यासाठी पायांचा वापर करावा लागतो असे अनेकदा दिसून येते. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी हा प्रवास जोखमीचा आणि दमछाक करणारा ठरतो. हा प्रवास सुखकर करण्यासाठी आता वृद्ध आणि अपंगांना पुन्हा पुन्हा रस्त्यावर पाय ठेवण्याची गरज भासणार नाही .

Auto Expo 2023
Travel In Europe : भारतीय नागरिकांना १ जानेवारीपासून युरोपातील या सुंदर देशात व्हिसा फ्री प्रवास करता येणार नाही

आता या सर्व समस्यांपासून त्यांचीही सुटका होणार आहे. स्वयं-संतुलन तंत्र वापरकर्त्याला सुरक्षित आणि आरामदायक राइड अनुभव प्रदान करण्यासाठी आहे. आता चिखलमय रस्त्यांवर संथ गतीने वाहन चालवताना किंवा सिग्नलवर थांबताना पाय जमिनीवर ठेवण्याची गरज नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.