Tata Motors Upcoming Electric Cars : पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या Auto Expo 2023 मध्ये अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांना सादर करणार आहे. या इव्हेंटमध्ये टाटा मोटर्स देखील नवीन इलेक्ट्रिक कार्सला लाँच करेल. कंपनी सध्या इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टॉपवर आहे. कंपनी ऑटो एक्स्पोमध्ये Tata Punch EV, Tata Curvv EV Concept SUV आणि Tata Avinya EV Concept SUV ला सादर करणार आहे.
Tata Punch EV
टाटा पंच ही कंपनीची सर्वात कमी किंमतीत येणारी एसयूव्ही आहे. आता कंपनी या एसयूव्हीचे इलेक्ट्रिक मॉडेल लाँच करण्याच्या तयारीत आहे. या कारला दोन बॅटरी पॅकसह सादर केले जाईल. कार २५ kWh आणि २७ kWh बॅटरी पॅकसह येईल. या दोन्ही बॅटरी पॅकची रेंज ३०० ते ४०० किमी असू शकते. तर गाडीची किंमत १० ते १२ लाख रुपयांपर्यंत असेल.
Tata Curvv EV Concept SUV
Tata Curvv EV ही एक कॉन्सेप्ट एसयूव्ही आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या इंटेरियरबद्दल सांगायचे तर फ्रंट सीट्स ३६० डिग्री फिरतील. यात जास्त कॅबिन स्पेस देखील मिळेल. तसेच, कमीत कमी बटनांसह टचस्क्रीन सपोर्टसह येणारा हायटेक डॅशबोर्ड मिळेल.
या कॉन्सेप्ट एसयूव्हीच्या लाँचिंगबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु, ऑटो एक्स्पोमध्ये याचे प्रोटोटाइप मॉडेल सादर केले जाईल. या गाडीची ड्राइव्हिंग रेंज ५०० ते ६०० किमी असेल.
Tata Avinya EV Concept SUV
Tata Avinya EV ही एक कूप डिझाइनसह येणारी एसयूव्ही आहे. याचे प्रोटोटाइप मॉडेल २०२३ च्या ऑटो एक्स्पोमध्ये सादर केले जाईल. या कॉन्सेप्ट कारला लेटेस्ट थर्ड जनरेशन प्योर ई्ही प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले आहे. कंपनी कारला दोन व्हेरिएंटमध्ये सादर करू शकते. याची ड्राइव्हिंग रेंज ५०० ते ७०० किमीपर्यंत असेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.