Auto Expo 2023 India : गेल्या काही वर्षांपासून Tata Motors सतत आपल्या इलेक्ट्रिक वाहनांचा पोर्टफोलिओ वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीने काही महिन्यांपूर्वी आपली Tiago EV भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. कंपनी सध्या देशात सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहने विकते. ज्यामध्ये Tiago EV, Tigor EV, Nexon EV Prime आणि Nexon EV Max सारख्या कार आहेत. यासोबतच टाटा मोटर्स आगामी ऑटो एक्स्पोमध्ये 3 नवीन इलेक्ट्रिक कारचे प्रदर्शन करणार आहे
टाटा पंच इ.व्ही
टाटा मोटर्स आपल्या फेमस असलेल्या पंच या गाडीचे EV मॉडेल सादर करणार आहे, जी कंपनीच्या ALFA प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. Altroz हॅचबॅक देखील त्याच प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. Ziptron इलेक्ट्रिक पॉवरट्रेन पंच EV मध्ये उपलब्ध असेल, ती Tiago आणि Tigor EV मध्ये देखील वापरली गेली आहे. यामध्ये दोन बॅटरी पॅक पर्याय असतील. इंटिरिअर्सचे पेट्रोल व्हेरियंटप्रमाणेच लूक असेल. यामध्ये EV-थीम कलर डिटेलिंगसह गडद-टोन्ड इंटीरियर, इन्स्ट्रुमेंट पॅनेलवर ट्राय-एरो पॅटर्नसह इलेक्ट्रिक ब्लू अॅक्सेंट, AC व्हेंट्स आणि सीट फॅब्रिक दिले जातील.
टाटा कर्व ईव्ही
ही एक नवीन EV प्लॅटफॉर्मवर आधारित टाटा कंपनीची कन्सेप्ट कार आहे, जी या वर्षी एप्रिलमध्ये सादर करण्यात आली होती. ही कन्सेप्ट कार कूप-डिझाइनवर आधारित आहे, ज्याला लेस इज मोअर' असे म्हणतात. हे कंपनीच्या इतर ईव्हीमध्ये देखील पाहिले जाऊ शकते. त्याची ICE आवृत्ती देखील पाहता येईल. या कारची रेंज सुमारे 400-500 किमी असू शकते.
टाटा अविन्या इ.व्ही
टाटा ने 2022 मध्ये त्यांची कन्सेप्ट EV अविन्या देखील लॉंच केली. ही गाडी कंपनीच्या लेटेस्ट जनरल 3 आर्किटेक्चरवर आधारित आहे. टाटा मोटर्सच्या म्हणण्यानुसार, ही कार किमान 500 किमीची रेंज देण्यास सक्षम असेल. त्याच्या डिझाईनबद्दल सांगायचे तर, अविन्या कन्सेप्ट ही MPV, हॅचबॅक आणि क्रॉसओव्हर यांचे मिश्रण आहे. या EV ला समोरच्या बाजूला 'T' आकाराची LED पट्टी मिळते जी अतिशय आकर्षक दिसते. जे हेडलॅम्पला जोडणाऱ्या DRL प्रमाणे काम करते. यात ड्युअल किंवा क्वाड इलेक्ट्रिक मोटर सेटअप मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.