Auto Expo : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आवडती कार म्हणजे टोयोटा मिराई. ही मिराई यंदाच्या ऑटो एक्सपोमध्ये दिसली आणि लोकांची मन सुद्धा जिंकली.टोयोटा मिराई बऱ्याच कारणांमुळे खास म्हणता येईल. यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे ही कार हायड्रोजन फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेईकल (FCEV) आहे. थोडक्यात गाडीच्या टाकीमध्ये हायड्रोजन भरलं की तुम्हाला 640 किलोमीटरपर्यंतची रेंज गाठता येते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बऱ्याचदा हायड्रोजनवर चालणाऱ्या या मिराई कारच कौतुक केलंय.
टोयोटा आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (iCAT) यांनी गेल्या वर्षी प्रायोगिक तत्वावर एक अभ्यास सुरू केला होता. यात मिराई गाडी भारतीय रस्ते आणि हवामान परिस्थितीशी जुळवून घेऊ शकते याच्या शक्यतांची चाचपणी करण्यात आली होती. नितीन गडकरी यांनी हा पायलट प्रोजेक्ट देशात हायड्रोजन फ्युएल सेल इलेक्ट्रिक वाहनांसाठी इकोसिस्टम तयार करण्याच्या उद्देशाने सुरू केलाय. आता या गाडीची नेक्स्ट जनरेशन असलेली Mirai FCEV आपल्याला या एक्स्पो मध्ये दिसली असेल. आत्ताच्या टोयोटा मिराई हायड्रोजन फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेइकलबद्दल बोलायच झाल्यास, सेडान श्रेणीतील या कारला हायड्रोजन फ्युएल सेल बॅटरी पॅक देण्यात आलाय.
कंपनीच्या दाव्यानुसार, हा बॅटरी पॅक 650 किमी पर्यंत बॅकअप देईल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इंधन भरण्यासाठी फक्त 5 मिनिटांचा वेळ लागतो. या कारला 174 BHP चा पॉवर आउटपुट मिळतो. मिराई टोयोटा न्यू ग्लोबल आर्किटेक्चर प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही सेडान कार लूक्स वाईज तर सुंदर आहेच पण तेवढीच दणकट देखील आहे. गाडी 4.9-मीटर-लांब असून व्हीलची उंची 20-इंच आहे. सोबतच 12.3-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह सुद्धा देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.