Auto Tips : पेट्रोलवर पैसे खर्च करून खिसा रिकामा झालाय ? मायलेज वाढवण्याच्या खास टिप्स जाणून घ्या

आपल्या गाडीचं मायलेज वाढवण्याची कला
Auto Tips
Auto Tipsesakal
Updated on

Auto Tips : भारतात राहणाऱ्या प्रत्येक वाहनचालक व्यक्तीला एक गोष्ट शिकून घेतली पाहिजे.. आपल्या गाडीचं मायलेज वाढवण्याची कला..कारण आपल्या देशात पेट्रोलचे दर सातत्याने गगनाला भिडलेले असतातच असतात. ही दरवाढ खाली येईल याची शक्यता फारच कमी असते. त्यामुळे पेट्रोलचे दर खाली येण्याची अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपल्या कारचं किंवा बाईकच मायलेज कसं वाढवता येईल हे फार महत्वाचं आहे. हे मायलेज वाढवायचं कसं याच्या काही टिप्स आपण जाणून घेऊयात.

Auto Tips
Travel Tips : लहान मुलांसोबत प्रवास करताय? टेन्शन नॉट या खास टिप्स करा फॉलो

१. गाडी वेळेवर सर्व्हिसिंग करून घ्या..

नियमित देखभाल आणि सर्व्हिसिंगमुळेत गाडीच मायलेज वाढण्यास मदत होते.इंजिन आणि गिअरबॉक्स सारख्या वाहनांच्या सतत फिरणाऱ्या भागांना लुब्रिकेशनची आवश्यकता असते. आपण हे न केल्यास ते मायलेजवर परिणाम होतो. सर्व्हिस ऑईल चेंज, कूलंट ऑइल लेव्हल, चेन लुब्रिकेशन याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

Auto Tips
Auto Tips : मारुती Alto पेक्षा स्वस्त! टाटांची ही हॅचबॅक केवळ 3 लाखांमध्ये उपलब्ध

२. टायरमधील एअर प्रेशर

टायरमधील एअर प्रेशरकडे लक्ष दिले पाहिजे. टायरवर जास्त दबाव येऊ नये. मॅन्युफॅक्चररच्या सूचनेनुसार टायरमध्ये हवा भरली पाहिजे. जास्त भार किंवा वजन असल्यास, गाडीचं हँडबुक वाचा आणि त्यानुसार टायरची हवा चेक करा.

Auto Tips
Auto Sector Layoffs : IT नंतर आता ऑटो सेक्टरमधील 'ही' मोठी कंपनी कर्मचाऱ्यांना देणार नारळ

३. कार पार्क करताना इंजिन बंद करायला विसरू नका

जेव्हा गाडी पार्क कराल तेव्हा इंजिन बंद करा. जर आपल्याला ट्रॅफिकमध्ये 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ थांबायचे असेल तर गाडी बंद केली पाहिजे. इंजिन सुरू केल्यास अधिक इंधन खर्च होते हा गैरसमज दूर करा.

Auto Tips
Weekend Travel : फक्त एकच दिवस सुट्टी घ्या आणि ४ दिवस फिरा; कसं कराल नियोजन ?

४. क्लचचा वापर कमी करा

जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच क्लच वापरा. क्लचचा जास्त वापर केल्यास जास्त इंधन वापरले जाते. जास्त क्लचचा वापर केल्यास क्लच प्लेटदेखील खराब होऊ शकते.

५. गाडीचा इंजिननुसार गिअर टाका.

150 सीसी इंजिन असणार्‍या वाहनास 55 किमी प्रति तासाच्या वेगाने थर्ड गिअरने चालवले जावे. यावर जाण्याने इंजिनवर ताण येईल जे माइलेजवर परिणाम करेल.

Auto Tips
Health Tips : लग्नानंतर मुलींच वजन का वाढतं?

६. जीपीएस वापरा

जीपीएसच्या वापरामुळे वाहनचे मायलेज वाढवण्यात मदत होऊ शकते. कोणत्या मार्गावर जास्त ट्रॅफिक आहे हे शोधण्यासाठी जीपीएसचा वापर होऊ शकतो. जीपीएसद्वारे कमी अंतराचा रुट शोधला जाऊ शकतात. यामुळे वाहनाचे मायलेजही वाढते.

७. पेट्रोल डिझेल भरण्याची वेळ लक्षात ठेवा..

सकाळी किंवा रात्री उशिरा गाडीमध्ये इंधन भरले पाहिजे. गरम झाल्यावर इंधन पसरते आणि थंड झाल्यावर दाट होते. दुपारी किंवा संध्याकाळी तेल भरण्याऐवजी सकाळी किंवा रात्री उशिरा ते भरले तर फायदा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.