Auto Tips : इलेक्ट्रिक स्कूटी चालवणे स्वस्त होईल की महाग? जाणून घ्या कॅलक्युलेशन

भारतात इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे
Auto Tips
Auto Tipsesakal
Updated on

Auto Tips : भारतात इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे . पेट्रोलच्या किमती पाहता लोक इलेक्ट्रिक स्कूटर घेणे चांगले मानत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अनुदानासह अनेक सवलतीही देते. तथापि, इलेक्ट्रिक स्कूटर चालवणे खरोखर स्वस्त आहे की नाही यावरून आपल्यापैकी अनेक जण गोंधळात पडतात. असं असलं तरी, पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटरपेक्षा इलेक्ट्रिक स्कूटर खूप महाग आहेत. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी संपूर्ण हिशेब घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुम्हाला कळेल की इलेक्ट्रिक स्कूटर चालवणे स्वस्त आहे की महाग.

Auto Tips
National Hug Day 2023 : “ जादू की झप्पी दिवस” जाणून घ्या का झाली आलिंगन दिनाची सुरुवात

भारतात अनेक इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपन्या आल्या आहेत, ज्या एकापेक्षा जास्त इलेक्ट्रिक स्कूटर विकतात. ते केवळ उत्कृष्ट रेंजच देत नाहीत तर ते जबरदस्त आणि आधुनिक फीचर देखील देतात. जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा प्लॅन बनवला असेल, तर त्याआधी येथे दिलेले कॅलक्युलेशन पहा. हे तुम्हाला चांगले निर्णय घेण्यास मदत करेल.

Auto Tips
Winter Recipe: हिवाळ्यात खायला पौष्टिक असणारं मेथीच्या भाजीच्या पिठलं कस तयार करायचं?

दोन्ही स्कूटरच्या किमती

इलेक्ट्रिक आणि पेट्रोल स्कूटर चालवण्याची किंमत जाणून घेण्यासाठी, आम्ही दोन स्कूटरची तुलना करू. यामध्ये Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटर आणि पेट्रोलवर चालणारी Honda Activa 6G स्कूटर यांचा समावेश आहे. स्टॉक मार्केट कोर्सेस आणि वेबिनारसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म असलेल्या Fingrade ने हे कॅलक्युलेशन केलेले आहे. त्यांच्या अहवालानुसार, Ather 450X ची ऑन-रोड किंमत रु. 1.73 लाख आहे, तर Honda Activa 6G ची ऑन-रोड किंमत रु. 94,000 आहे. दोन्हीच्या किमतीत 5 वर्षांचा विमा देखील समाविष्ट आहे.

Auto Tips
Couple Travel : फेब्रुवारीत जोडीदारासोबत फिरण्यासाठी उत्तम आहेत ही ठिकाणे

1 वर्षात इतके किमी धावणार

जर तुम्ही दररोज 25 किलोमीटरचा प्रवास केला तर दोन्ही स्कूटर एका वर्षात एकूण 9,125 किलोमीटर धावतील. आता आपण पाहू की इलेक्ट्रिक स्कूटरची चार्जिंग किंमत प्रति चार्ज 27.5 रुपये असेल आणि पेट्रोलची किंमत 100 रुपये प्रति लीटर असेल तर त्याची किंमत किती असेल. लक्षात घ्या की Ather 450X ची सिंगल चार्ज रेंज 100 किमी आहे, तर Activa 6G चे मायलेज 45kmpl आहे.

Auto Tips
Travel Tips : हिवाळ्यात हवीय उन्हाळ्याची मज्जा ?या हॉट स्प्रिंग्स डेस्टिनेशनला नक्की भेट द्या

५ वर्षाचा खर्च

त्यानुसार, एका वर्षासाठी इलेक्ट्रिक स्कूटर चालवण्यासाठी 2,509 रुपये खर्च येईल. दुसरीकडे, Activa 6G ची एक वर्षाची किंमत 20,278 रुपये आहे. जर आपण पाच वर्षांचा विचार केला, तर Ather 450X चालवण्यासाठी रु. 12,546 खर्च येईल, तर Activa 6G पाच वर्षांसाठी चालविण्यासाठी रु. 1,01,389 खर्च येईल.

Auto Tips
Winter Health : ५५ च्या वरच्या लोकांनी या गोष्टी फॉलो कराव्याच

इलेक्ट्रिक स्कूटर: महाग किंवा स्वस्त

पाच वर्षांसाठी इलेक्ट्रिक स्कूटरची सर्व्हिस प्राइज 36,000 रुपये असेल, तर अ‍ॅक्टिव्हाच्या सर्व्हिसचा खर्च 22,500 रुपये असेल. Ather इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीसह 5 वर्षांमध्ये एकूण किंमत 2,21,457 रुपये होईल, तर Activa खरेदी आणि चालवण्याची एकूण किंमत 2,17,889 रुपये असेल. या कॅलक्युलेशननुसार इलेक्ट्रिक स्कूटर चालवणे महागडे ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.