Password Manager Apps : पासवर्ड 'सुरक्षित' ठेवण्याचा दावा करणारे हे अ‍ॅप्सच करतायत डेटा लीक; तुमच्याकडे तर नाहीत ना?

IIT हैदराबादने अशा काही अ‍ॅप्सबाबत इशारा दिला आहे. हे लोकप्रिय पासवर्ड मॅनेजर अ‍ॅप्स आहेत.
Password Manager Apps
Password Manager AppseSakal
Updated on

Password Manager Apps Leaking Data :

आजकाल सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्यामुळे 'पासवर्ड' अगदी महत्त्वाचा झाला आहे. एकवेळ घराची चावी हरवली तर कमी नुकसान होईल, मात्र तुमचा पासवर्ड लीक झाला तर आयुष्यभराची मेहनत वाया जाण्याचा धोका असतो. वारंवार वेगवेगळे पासवर्ड लक्षात ठेवावे लागू नयेत, यासाठी लोक पासवर्ड मॅनेजर अ‍ॅप्स वापरतात. मात्र, हे अ‍ॅप्सच जर तुमचा डेटा लीक करत असतील तर?

IIT हैदराबादने अशा काही अ‍ॅप्सबाबत इशारा दिला आहे. हे लोकप्रिय पासवर्ड मॅनेजर अ‍ॅप्स (Password Manager Apps) आहेत, मात्र यूजर्सची माहिती गोपनीय ठेवण्याऐवजी ते पासवर्ड लीक करत असल्याचं समोर आलं आहे. तुम्हीदेखील या दोनपैकी एखादं अ‍ॅप वापरत असाल, तर तातडीने ते डिलीट करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

या अँड्रॉईड अ‍ॅप्समध्ये असलेल्या एका त्रुटीमुळे हॅकर्स आरामात यातील डेटा (Password Leak) चोरू शकत आहेत. पासवर्ड ऑटोफिल करत असताना AutoSpill नावाच्या एका त्रुटीमुळे हे होत असल्याचं संशोधकांनी सांगितलं. फेसबुक, मायक्रोसॉफ्ट किंवा गुगल अशा ठिकाणी लॉगिन पेज लोड झाल्यानंतर हे पासवर्ड मॅनेजर ऑटोफिलचा (Autofill Password) पर्याय देतात. मात्र, ऑटोफिल करताना यातील डेटा चोरी केला जाऊ शकतो. (Cyber Crime)

Password Manager Apps
Common Password : जगातील कोट्यवधी लोकांचा एकच पासवर्ड; तुमचा तर नाही ना हाच?

कोणते आहेत अ‍ॅप्स?

1Password, LastPass, EnPass, Keepass2Android या अ‍ॅप्सबाबत हा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तुमच्याकडेही हे अ‍ॅप्स असतील तर त्वरीत डिलीट करण्याचा सल्ला IIT हैदराबादने दिला आहे.

1पासवर्डचे सीटीओ पेड्रो कॅनाहुती यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. यूजर्सचा महत्त्वाचा डेटा सुरक्षित ठेवण्याला आमचं प्राधान्य आहे. ऑटोस्पिल नावाची त्रुटी ओळखली गेली असून, त्याला थांबवण्यासाठी वेगाने काम सुरू असल्याचं पेड्रो यांनी स्पष्ट केलं. (Tech News)

कोणते अ‍ॅप्स सुरक्षित

या सर्वेक्षणात दोन अ‍ॅप्स सुरक्षित असल्याचं समोर आलं आहे. Dashlane आणि Google Smart Lock या दोन पासवर्ड मॅनेजर अ‍ॅप्सचा वापर करणं सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. (Which apps are safe?)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.