Bajaj Chetak इलेक्ट्रिक स्कूटर, आता 'या' शहरात देखील होणार विक्री

bajaj chetak electric scooter now available for purchase in 20 indian cities check dtails
bajaj chetak electric scooter now available for purchase in 20 indian cities check dtails
Updated on

सध्या इलेक्ट्रिक वाहनांची (EV) मागणी जोरात वाढत आहे, त्यातच बजाजच्या चेतक इलेक्ट्रिक स्कूटर ला देखील ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. यादरम्यान बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर (bajaj chetak electric scooter) हे आता दिल्ली, गोवा आणि मुंबईसह देशातील 20 शहरांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. बजाज ऑटोने आज ही माहिती दिली. 2022 च्या पहिल्या 6 आठवड्यात चेतक नेटवर्क दुप्पट करण्यात यशस्वी झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.

बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर साठी सध्या 4 ते 8 आठवड्यांचा प्रतीक्षा कालावधी (Waiting Period) सुरु आहे. ज्या ग्राहकांना ते खरेदी करायचे आहे ते कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन बुक करू शकतात. कंपनीने 2022 च्या सुरुवातीला चेतकच्या नेटवर्कमध्ये 12 नवीन शहरे जोडली आहेत. ज्यात कोईम्बतूर, मदुराई, कोची, कोझिकोड, हुबळी, विशाखापट्टणम, नाशिक, वसई, सुरत, दिल्ली, मुंबई आणि मापुसा यांचा समावेश आहे.

bajaj chetak electric scooter now available for purchase in 20 indian cities check dtails
रिलायन्स जिओला मोठा झटका! गमावले 1.29 कोटी ग्राहक; तर एअरटेलने..

300 कोटींची गुंतवणूक

बजाज ऑटोने आपली इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी 300 कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणाही केली आहे. या प्रसंगी बोलताना बजाज ऑटोचे कार्यकारी संचालक राकेश शर्मा म्हणाले की, चेतकच्या यशामागचे कारण त्याच्या गुणवत्तेत आहे. आमच्याकडे विक्री आणि सेवेसाठी संपूर्ण ऑन-ग्राउंड नेटवर्क आहे, जे ग्राहकांच्या चिंता कमी करते. उच्च मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही येत्या काही आठवड्यात चेतकचे नेटवर्क दुप्पट करण्याची योजना आखत आहोत.

bajaj chetak electric scooter now available for purchase in 20 indian cities check dtails
स्वतःची गाडी परवडेना? मारुती सुझुकी स्वस्तात भाड्याने देतीय कार

बॅटरी आणि मायलेज

अर्बन आणि प्रीमियम व्हेरियंटमध्ये, चेतकचे दोन्ही ट्रिम मेकॅनिकल स्वरुपात समान आहेत. या दोन्ही स्कूटरमध्ये 3.8kW ची मोटर आहे. यासोबतच यामध्ये नॉन रिमूव्हेबल 3kWh IP67 लिथियम-आयन बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे. मात्र, बाजारात अनेक इलेक्ट्रिक स्कूटर आता बदलण्यायोग्य/काढता येण्याजोग्या बॅटरी असलेल्या तंत्रज्ञानासोबत येतात. चेतकला अजून हे टेकनॉलॉजी देण्यात आलेली नाही. बजाज चेतक 70kmph ची टॉप स्पीड आणि 95km च्या रेंजसह (इको मोडमध्ये) येते. Indigo Metallic, Velutto Rosso, Brooklyn Black आणि Hazelnut कलर पर्यायांसह बजाज चेतक बाजारात उपलब्ध आहे येतो.

bajaj chetak electric scooter now available for purchase in 20 indian cities check dtails
Paytm देतंय कुठल्याही गॅरंटीशिवाय 5 लाखांचं कर्ज; वाचा प्रोसेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()