Bajaj Chetak Electric स्कूटरला तरुणाईची पसंती, जाणून घ्या फिचर्स व किंमत

जाणून घ्या बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरविषयी
Bajaj Chetak Electric Scooter
Bajaj Chetak Electric Scooteresakal
Updated on

इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईकची मागणी भारताच्या देशाअंतर्गत बाजारात सतत वाढत आहे. त्यामुळे वाहन निर्माता कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईकची नव-नवीन माॅडल लाँच करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आज बाजारात इलेक्ट्रिक स्कूट (Electric Scooter) आणि बाईकची एक मोठी रेंज उपलब्ध आहे. प्रत्येक बजेट आणि आवश्यक हिसाबाने सहज मिळते. त्यात आज आम्ही बोलत आहोत एका अशा इलेक्ट्रिक स्कूटर बजाज (Bajaj) चेतकविषयी (Bajaj Chetak Electric Scooter). ती आपल्या प्रीमियम डिझाईन आणि रेंजसाठी पसंत केली जाते. स्कूटरची बॅटरी आणि पाॅवरविषयी बोलाल तर त्यात ४८ व्ही, ६०.३ एचव्ही क्षमता असणाऱ्या लिथियम आर्यन बॅटरी पॅक दिले गेले आहे. (Bajaj Chetak Electric Scooter Popular Among Youths, Know Its Features And Price)

Bajaj Chetak Electric Scooter
Ola Electric Scooter बद्दल कंपनीचा मोठा निर्णय, फक्त एकाच मॉडेलची विक्री सुरू

त्याबरोबरच चार हजार ८० व्हॅटचे बीएलडीसी मोटार दिले गेले आहे. बॅटरी चार्जिंगबाबात दावा आहे, की नाॅर्मल चार्जरने चार्ज केल्यास ही बॅटरी पाच तासात फुल चार्ज होते. फास्ट चार्जरने ६० मिनिटांमध्ये २५ टक्के चार्ज होते, असा दावा कंपनीने केला आहे. या बॅटरीवर कंपनी सात किंवा ७० हजार किलोमीटरची वाॅरंटी देत आहे. त्यात ५० हजार किलोमीटर आणि तीन वर्षांचे बॅटरी वाॅरंटीचे प्लॅनही आहे. स्कूटरची रेंज आणि स्पीडविषयी बोलाल तर कंपनीचा दावा आहे, की एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही स्कूटर ९५ किलोमीटरची रेंज देते. त्याबरोबरच ७० किलोमीटर प्रतितास टाॅप स्पीड मिळते.

Bajaj Chetak Electric Scooter
मारुतीच्या ‘Baleno' ची प्रतीक्षा संपली, फक्त 11 हजारात करा बुक

स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टिम म्हणाल तर तिच्या फ्रंट व्हिलमध्ये डिस्क ब्रेक आणि रिअर व्हिलमध्ये ड्रम ब्रेकचे काॅबिनेशन दिले गेले आहे. जे काॅम्बी ब्रेकिंग सिस्टिमवर आधारित आहे. डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ऑडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, रिपोर्ट स्टार्ट, पुश बटण स्टार्ट-स्टाॅप आदी फिचर्स स्कूटरमध्ये दिले गेले आहे. कंपनीने लोकांच्या वेगवेगळ्या ड्रायव्हिंग स्टाईल लक्षात घेऊन त्यात दोन ड्रायव्हिंग मोड दिले आहे. ज्यात पहिला ईको मोड आणि दुसरा स्पोर्ट मोड आहे. तरुणाईपर्यंत जास्तीत-जास्त पोहोचण्यासाठी या स्कूटरला आकर्षक डिझाईनसह सहा आकर्षक रंगांमध्ये सादर केले आहे. कंपनीने या स्कूटरला १ लाख ४१ हजार ४४० रुपयांचे सुरुवाती किंमतीसह (एक्स शोरुम, पुणे) लाँच केले आहे. जी फेम II अनुदानासहित उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.