Bajaj CNG Bike Mileage : सध्या टू-व्हीलर सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त चर्चा बजाजच्या सीएनजी बाईकची आहे. या गाडीची चाचणी होत असतानाचे काही फोटो सध्या लीक झाले आहेत. यावरुन या गाडीचं डिझाईन कसं असू शकेल याचा अंदाज लावण्यात येत आहे. याआधी देखील या गाडीबद्दल कित्येक गोष्टी मीडिया रिपोर्टमध्ये समोर आल्या आहेत.
ऑटोकार इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, या गाडीचं नाव 'ब्रूझर' असं असू शकतं. सध्या बजाजकडे कम्युटर सेगमेंटमध्ये तीन प्रकारचे इंजिन उपलब्ध आहेत. 102cc, 115cc आणि 124cc असे तीन इंजिन बजाजकडे आहेत. यातील कोणतं इंजिन सीएनजी गाडीमध्ये लावण्यात येईल हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. एकाच किंवा विविध प्रकारच्या इंजिन व्हेरियंटसह देखील ही गाडी लाँच केली जाऊ शकते.
लीक झालेल्या फोटोंमध्ये पूर्ण गाडीचं डिझाईन लक्षात येत नाही. मात्र, एलईडी हेडलाईट, फ्रंट काउल, नकल गार्ड आणि 5-स्पोक अलॉय व्हील देखील दिसत आहे. यामध्ये टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मोनोशॉक दिसत आहे. CNG टँक हा सीट आणि पेट्रोल टँक असतो त्या जागेच्या खाली दिसत आहे. यामध्ये बाय-फ्युएल सेटअप (Bi-fuel Setup) असण्याची देखील शक्यता मीडिया रिपोर्ट्समध्ये व्यक्त करण्यात येत आहे.
या गाडीचं मायलेज आणि किंमत किती असेल याबाबत अद्याप खात्रीशीर माहिती समोर आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्स आणि लीक्समध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, बजाजची प्लॅटिना ही कम्युटर बाईक सुमारे 70 किलोमीटर प्रतिलीटर मायलेज देते. त्या तुलनेत CNG गाडीचं मायलेज हे कितीतरी अधिक असल्याचं म्हटलं जात आहे.
या गाडीची किंमत एक लाख रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार ही किंमत 80,000 रुपये असू शकते. तसंच ही CNG Bike यावर्षी जून महिन्यापर्यंत लाँच केली जाऊ शकते, असंही म्हटलं जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.