Bajaj Pulsar 250 launched : बजाज ऑटोने भारतीय बाजारपेठेत त्यांची नवीन Pulsar N250 नेकेड स्ट्रीट बाईक लॉंच केली आहे. या दमदार बाईकची किंमत 1.38 लाख रुपयांपासून सुरु होते. पल्सरच्या F250 ची किंमत 1.40 लाख पर्यंत आहे. नवीन Pulsar N250 बाईकही पुर्वीच्या डिझाईनवर बेस्ड असून यात पूर्ण एलईडी हेडलॅम्प आणि डीआरएल, प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी इंडिकेटर आणि बायपर्गेटेड टेललाइट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मस्क्यूलर फ्युएल टँक, स्प्लिट सीट सेटअप आणि मोनोशॉक रियर सस्पेंशन यांसारख्या फीचर्ससह देण्यात आली आहेत.
या बाईक्समध्ये देखील तुम्हाला Pulsar ची सिग्नेचर स्टाइल पाहायला मिळेल, तसेच या बाईकमध्ये काही अडव्हांस इलेमेंट देखील देण्यात आले आहेत. नवीन बजाज पल्सर 250 दोन व्हेरियंटमध्ये खरेदी करता येईल - Pulsar N250 आणि Pulsar F250. Pulsar N250 एक नेकेड स्टँडर्ड मॉडेल म्हणून येते आणि Pulsar F250 ही क्वार्टर-लिटर मोटरसायकलची सेमी-फेअर्ड व्हर्जन आहे.
नवीन Pulsar N250 ही बाइक पल्सर सीरीजमधील फ्लॅगशिप मॉडेल म्हणून लॉंच करण्यात आले आहे. बजाज ऑटोने भारतात किंवा जगात इतरत्र लॉन्च केलेली ही सर्वात शक्तिशाली पल्सर आहे. यामध्ये तुम्हाला लिक्विड-कूल्ड इंजिन दिले असून ते 24.5 PS पॉवर आणि 21.5 Nm टॉर्क जनरेट करते. 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. चांगल्या सेफ्टीसाठी यात 300 मिमी डिस्क ब्रेक 230 मिमी रिअर डिस्क, सिंगल-चॅनल एबीएस देण्यात आले आहे. बाईकमध्ये तुम्हाला 100 मिमी फ्रंट, 130 मिमी मागील क्रॉस-सेक्शन टायर देण्यात येतील.
नवीन बजाज पल्सर 250 मध्ये टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागे सिंगल मोनोशॉक युनिट दिले आहे. आधीच्या पल्सर 220F मॉडेलच्या तुलनेत हे एक मोठे अपडेट आहे, जे मागील बाजूस ट्विन शॉक युनिट्ससह येते. Pulsar 250F च्या रूपात पल्सरचे नवीन सेमी-फेअर व्हर्जन देखील सादर करण्यात आले आहे. हे व्हर्जन पल्सरच्या 220F व्हर्जनचे विस्तारीत रुप म्हणून लॉंच करण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.