Bajaj-Triumph : ४०० सीसी गाड्यांमध्ये वाढली स्पर्धा; आता ट्रायम्फच्या दोन दमदार बाईक्स लाँच! पाहा फीचर्स

ट्रायम्फ या ब्रिटिश कंपनीने बजाज सोबत टायअप केलं आहे.
Bajaj-Triumph
Bajaj-TriumpheSakal
Updated on

मंगळवारीच हार्ले डेव्हिडसन कंपनीने आपली ४४० सीसी क्षमतेची बाईक भारतात लाँच केली होती. अगदी परवडणाऱ्या दरात ही दमदार बाईक मिळत असल्यामुळे रॉयल एनफिल्डचं टेन्शन वाढलं होतं. यातच आता ट्रायम्फ या आणखी मोठ्या कंपनीच्या ४०० सीसी क्षमतेच्या आपल्या दोन गाड्या भारतात आज लाँच झाल्या आहेत.

ट्रायम्फ या ब्रिटिश कंपनीने भारतात आपल्या गाड्या लाँच करण्यासाठी बजाज सोबत टायअप केलं आहे. यानुसार या गाड्यांचं डिझाईन यूकेमध्येच करण्यात आलं आहे. मात्र, याची निर्मिती आणि टेस्टिंग अशा गोष्टी बजाजने भारतात केल्या आहेत. Speed 400 आणि Scrambler 400X अशी या दोन गाड्यांची नावं आहेत.

Bajaj-Triumph
Bike Riding Tips : पावसाळ्यात दुचाकी चालवताना काय घ्यावी खबरदारी? या टिप्स वाचवतील तुमचा जीव

इंजिन

ट्रायम्फच्या या दोन्ही गाड्यांमध्ये लिक्विड कूल्ड, सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आलं आहे. याची क्षमता ३९८.१५ सीसी एवढी आहे. हे इंजिन ३९.५ bhp पॉवर आणि ३७.५ nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनला ६-स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिप असिस्ट देण्यात आलं आहे. दोन्ही गाड्यांमध्ये सारखंच इंजिन आहे.

गाड्यांमधील फरक

ट्रायम्फच्या या दोन्ही गाड्यांमध्ये फ्रेमदेखील सारखीच देण्यात आली आहे. मात्र या दोन्हीच्या चाकांमध्ये मोठा फरक आहे. स्पीड ४०० या गाडीमध्ये दोन्ही चाकं १७ इंचाची आहेत. तर, स्क्रॅम्बलर ४०० एक्स या गाडीमध्ये पुढचं चाक १९ इंचाचं आणि मागचं चाक १७ इंचाचं आहे.

Bajaj-Triumph
Royal Enfield Electric Bike : लवकरच येणार 'इलेक्ट्रिक बुलेट'; रॉयल एनफिल्डच्या सीईओंनी दिली महत्त्वाची माहिती

बुकिंग सुरू

या गाड्यांचं प्री-बुकिंग ४ जुलैपासूनच सुरू करण्यात आलं आहे. तुम्ही नजीकच्या बजाज शोरूममध्ये जाऊन याचं बुकिंग करू शकता. यासाठी तुम्हाला दोन हजार रुपये बुकिंग अमाउंट द्यावी लागणार आहे. या गाड्यांमध्ये तीन कलर ऑप्शन देण्यात आले आहेत.

कोणाला टक्कर?

या गाड्या अडीच ते तीन लाख या प्राईज रेंजमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास भारतात आधीपासून असलेल्या रॉयल एनफिल्ड, जावा, टीव्हीएस, हार्ले (हीरो) अशा कंपन्यांना या गाड्या टक्कर देऊ शकतील.

Bajaj-Triumph
Harley-Davidson X440 : भारतात आली स्वस्तातली हार्ले डेव्हिडसन; किंमत बघून बुलेटला फुटला घाम..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.