Face Recognition: फक्त चेहरा दाखवा आणि बँकेतून पैसे काढा, खातेधारकांसाठी येणार खास टेक्नोलॉजी

लवकरच बँकेतून पैसे काढण्यासाठी फेस आयडी आणि आइरिश स्कॅनिंग टेक्नोलॉजीचा वापर केला जाणार आहे.
Face Recognition
Face RecognitionSakal
Updated on

Face Recognition Technology: सध्या स्मार्टफोनला अनलॉक करण्यासाठी फेस आयडीचा वापर केला जातो. मात्र, आता लवकरच बँकेतून पैसे काढण्यासाठी देखील ही टेक्नोलॉजी वापरली जाणार आहे. आतापर्यंत बँकेतून पैसे काढण्यासाठी केवळ सहीची गरज होती. मात्र, आता चेहरा आणि डोळ्यांच्या रेटिनाला स्कॅन करावे लागेल.

सरकार बँक व्यवहारासाठी फेस आयडी आणि आइरिश स्कॅनिंग सुरू करण्याचा विचार करत आहे. परंतु, फेस आयडीची गरज सर्व व्यवहारांसाठी नसेल. सरकारनुसार, यामुळे टॅक्स चोरी कमी होईल. रिपोर्टनुसार, काही खासगी व सरकारी बँकांनी फेस आयडी आणि आइरिश स्कॅनिंग सुरू केले आहे. याबाबत सार्वजनिक घोषणा करण्यात आली नसली तरीही बँकांनी यावर काम सुरू केले आहे.

Face Recognition
iPhone Offer: आयफोनवर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, ३० हजार रुपये स्वस्तात करा खरेदी; पाहा ऑफर

रिपोर्टनुसार, फेस आयडी व्हेरिफिकेशन अनिवार्य नसेल. खातेधारकाकडे सरकारी ओळखपत्र, पॅन कार्ड नसेल अशावेळी या टेक्नोलॉजीचा वापर केला जाईल. या टेक्नोलॉजीसोबतच प्रायव्हसीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. कारण, भारतात फेस आयडी, सायबर सिक्योरिटी, प्रायव्हसीबाबत विशेष कायदा नाही.

जे खातेधारक एका वर्षात २० लाखांपेक्षा अधिक रक्कमेचा व्यवहार करतात, त्यांना फेस आयडी आणि आइरिश आयडीचा वापर करावा लागेल. फेस आयडी व्यतिरिक्त खातेधारकांना ओळखपत्र म्हणून आधार कार्ड देखील द्यावे लागेल.

हेही वाचा: Amazon Sale: सुरू होतोय वर्षातील पहिला बंपर सेल, फोन-टीव्ही निम्म्या किंमतीत खरेदीची संधी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी वित्त मंत्रालयाने बँकांना युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या पत्रानंतर आवश्यक पावले उचलण्यास सांगितले जाते. जेथे फिंगरप्रिंट व्हेरिफिकेशनचा वापर करता येत नाही, तेथे फेस आयडी आणि आइरिस स्कॅनिंग टेक्नोलॉजीचा वापर करावा, असे म्हटले होते.

हेही वाचा: पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.