Beer Research Report : जर तुम्ही बिअरचे शौकीन असाल तर सावध व्हा कारण तिची चव बदलू शकते. आणि हे तुम्हाला महाग पडू शकते. शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात हा दावा केलाय. युरोपियन बिअर जगभर प्रसिद्ध आहे. ती युरोपियन हॉप्सपासून तयार केली जाते. ही एक विशेष प्रकारची वनस्पती आहे जी बिअरला विशेष चव आणि सुगंध देण्याचे काम करते. आता तिचं स्वरूप बदलत आहे.शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात या बदलाचे कारण स्पष्ट केले आहे. यासोबतच हा बदल सकारात्मक की नकारात्मक, हेही सांगण्यात आले आहे.
संशोधन का आणि कसे सुरू झाले?
गेल्या काही वर्षांत बीअरमध्ये वापरात आणणाऱ्या पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. शास्त्रज्ञांनी याला हवामान बदलाचे कारण दिले आहे. हे संशोधन करणाऱ्या झेक अॅकॅडमी ऑफ सायन्सेस आणि केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, बिअर पिणाऱ्या लोकांवर हवामान बदलाचे परिणाम दिसून येतील.
आता यामागची गोष्ट सोप्या शब्दात समजून घेऊ. वास्तविक, बिअरला त्याचा विशेष सुगंध आणि चव हॉप्स नावाच्या वनस्पतींमधून मिळते. जगभरात वाढते तापमान आणि कमी होत असलेला पाऊस यामुळे हवामान चक्र बिघडत आहे. त्याचा थेट परिणाम पिकांवर होत आहे. हॉप्सलाही हीच समस्या भेडसावत आहे. त्यांचे उत्पादन कमी होत आहे.
चवीत होणार बदल
एका रिपोर्टनुसार, हवामान बदलाच्या प्रभावामुळे हॉप्सपासून तयार होणाऱ्या बिअरची चव बिघडू शकते. आता बिअरसाठी हॉप्स किती महत्त्वाचे आहेत ते समजून घेऊ. बिअर चार घटकांपासून बनते - पाणी, यीस्ट, माल्ट आणि हॉप्स. हॉप हा वनस्पतीचा फुलांचा भाग आहे. बिअरच्या उकळत्या प्रक्रियेपूर्वी ती द्रवात मिसळलो जाते. यामुळे बिअरला कडूपणा येतो. मग त्याची चव आणखीन बदलते.
जगभरात उच्च दर्जाच्या हॉप्सची मागणी वाढत आहे. पण गेल्या अनेक दशकांत यात बदल झाल्याचे संशोधन सांगतो. त्याचा सुगंध बदलतो. त्याचे उत्पादनही घटले आहे.संशोधक मार्टिन मोजने सांगतात, या वनस्पतीवर हवामान बदलाचा परिणाम झाल्याने त्याचे उत्पादन आणखी कमी होणार असल्याचे स्पष्ट होते. त्याच्या किमती वाढतील. त्याच्या किंमती आधीच 13 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
हे सर्वात मोठे कारण आहे
शास्त्रज्ञ म्हणतात, हॉप्समध्ये अल्फा बिटर अॅसिड आढळते. हे बिअरला चव देण्याचे काम करते. वाढत्या तापमानामुळे होणाऱ्या उष्णतेचा याचा सर्वाधिक परिणाम होत आहे. 2050 पर्यंत यातील हे बिटर ॲसिड 30 टक्क्यांनी कमी होईल, असा दावा संशोधनात करण्यात आला आहे.हवामान बदल रोखण्यासाठी जगभर प्रयत्न केले जात आहेत, मात्र तापमानात सातत्याने वाढ होत आहे. पुढील 5 ते 7 वर्षात जगभरातील तापमान 1.5 अंश सेल्सिअसने वाढण्याची भीती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.