पृथ्वीच्या दिशेने येत असलेल्या बेन्नू उपग्रहाचं रहस्य उलगडण्यात नासाच्या वैज्ञानिकांना यश मिळालं आहे. नासाचं एक यान या उपग्रहावरील मातीचे नमुने घेऊन परतलं होतं. या मातीमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त कार्बन आणि भरपूर प्रमाणात पाणी मिळालं असल्याचं नासाने स्पष्ट केलं आहे.
बेन्नू उपग्रहावरील मातीचे नमुने आणण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने OSIRIS-REx ही मोहीम राबवली होती. या उपग्रहावरील मातीचे नमुने घेऊन नासाचं यान गेल्याच महिन्यात पृथ्वीजवळ पोहोचलं होतं. यानंतर याचा अभ्यास सुरू होता.
या अभ्यासात काय समोर आलं याची माहिती आता नासाने जाहीर केली आहे. एका एक्स पोस्टमध्ये नासाने या मातीच्या सॅम्पलचा फोटो, आणि इतर माहिती दिली आहे. "या मातीमध्ये जेवढा अपेक्षित होता त्याहून अधिक प्रमाणात कार्बन आढळला आहे. तसंच, 4.5 अब्ज वर्षांहून जुन्या या लघुग्रहात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याचं स्पष्ट झालं आहे. याचाच अर्थ, पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण करणारे दोन घटक यामध्ये आहेत."
"पृथ्वीवर आतापर्यंत आणलेल्या लघुग्रहांच्या सॅम्पलपैकी हे सगळ्यात जास्त कार्बन-रिच सॅम्पल आहे. यामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी कशी तयार झाली याचं रहस्य उलगडण्यात देखील मदत होऊ शकते." असं नासाचे संचालक बिल नेस्लन यांनी स्पष्ट केलं. "ओसिरिस रेक्स सारख्या मोहिमांमुळे आपलं पृथ्वीला धोका ठरू शकणाऱ्या लघुग्रहांबद्दलचं ज्ञान वाढणार आहे, आणि अंतराळात आणखी काय आहे याबाबत माहिती मिळणार आहे." असंही ते म्हणाले.
बेन्नू हा उपग्रह अतिशय वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. 1999 साली या उपग्रहाचा शोध लावण्यात आला होता. नासाने दिलेल्या माहितीनुसार 2182 साली हा उपग्रह पृथ्वीला धडकू शकतो. यामुळे गरज भासल्यास अंतराळातच त्याला फोडण्याची नासाची योजना आहे. त्यामुळेच याच्या मातीचे नमुने नासाने गोळा केले आहेत.
नासाच्या योजनेनुसार केवळ 60 ग्रॅम माती आणणं अपेक्षित होतं. मात्र, यासाठी नेमलेल्या यानाने 100 ते 250 ग्रॅम माती आणली आहे. या मातीचे सॅम्पल जगभरातील 60 प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आलं आहे. सुमारे 200 वैज्ञानिक या मातीचा अभ्यास करणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.