Best Affordable Car Options for a Daily Run : तुम्ही देखील बजेटमध्ये बसेल अशी कार शोधत असाल तर आज आपण अशा वाहनांबद्दल माहिती घेणार आहोत ज्या कमी बजेटमध्ये चांगले फीचर्स आणि सुरक्षा देतात. इतकेच नाहीतर या कार्सचे मायलेज दैनंदिन वापराच्या दृष्टीने देखील चांगले आहे. नवीन कार घेण्यापूर्वी काही बाबींकडे विषेश लक्ष देणे आवश्यक असते. कार विकत घेण्यापूर्वी, कोणती कार तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल याचा विचार केला पाहिजे, आम्ही तुमच्यासाठी अशी 5 वाहने घेऊन आलो आहोत, जी तुमच्या गरजेनुसार योग्य पर्याय ठरू शकतात.
वॅगन आर
फॅमिली कार म्हणून वॅगन आरला प्राधान्य दिले जाते. ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. त्याचे सीएनजी व्हेरिएंट (मारुती वॅगनआर सीएनजी) खूप लोकप्रिय आहे. WagonR CNG चे मायलेज 32.52 किमी प्रति लिटर पर्यंत आहे. ही भारतात 4.93 लाख ते 6.45 लाख रुपये मध्ये खरेदी केली जाऊ शकते. WagonR च्या पेट्रोल व्हेरिएंटचे मायलेज 21.79 kmpl पर्यंत आहे. हे LXi, VXi आणि ZXi या 3 ट्रिम स्तरांवर 14 व्हेरिएंटमध्ये येते. ग्लोबल NCAP सेफ्टी टेस्टमध्ये याला 2 स्टार रेटिंग मिळाले आहे.
मारुती सेलेरियो
मारुतीच्या या हॅचबॅक वाहनाला 1.0-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 67 PS पॉवर आणि 89 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल (मानक) आणि 5-स्पीड AMT पर्यायासह ऑफर केले आहे. इंजिन सोबत, याला सेगमेंट फर्स्ट ऑटोमॅटिक आयडल स्टार्ट-स्टॉप फीचर देखील मिळते. Celerio ही भारतातील सर्वात जास्त फ्युल इफिशियंट कार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ARAI नुसार मारुती सेलेरियोचे मायलेज 26.68 kmpl आहे.
ही सर्वात जास्त मायलेज देणारी कार असून इतर वाहनांच्या तुलनेत हीचे मेंटन्स देखील खूप स्वस्त आहे. त्याच वेळी, त्याचे रिसेल किंमत देखील चांगली आहे. पार्ट्सबद्दल बोलायचे झाले तर मारुती कार असल्याने तिचे पार्ट्स इतर वाहनांच्या तुलनेत स्वस्त आहेत. स्विफ्टप्रमाणेच मारुती सेलेरियो सुझुकीच्या हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. स्विफ्टला ग्लोबल सेफ्टी क्रॅश टेस्टमध्ये 2 स्टार रेटिंग मिळाले आहे. त्याची किंमत 4.99 लाख ते 6 लाख यादरम्यान आहे.
टाटा टियागो
Tata Tiago ही एंट्री लेव्हल सेगमेंटमधील सुरक्षिततेच्या दृष्टीने सेगमेंटमधील सर्वोत्तम कार आहे, ज्याला ग्लोबल Ncap क्रॅश टेस्टमध्ये 4 स्टार रेटिंग मिळाले आहे. त्याची किंमत 5 लाख ते 7.07 लाख रुपये आहे. Tata Tiago मध्ये 1.2 लिटर, 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 86PS पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्सच्या पर्यायासह उपलब्ध आहे. ARAI च्या मते, Tata Tiago 23.84 kmpl पर्यंत मायलेज देते. ही देखील एक परवडणारी कार आहे. उत्कृष्ट लुकसोबतच यामध्ये फिचर्स देखील चांगले आहेत.
मारुती स्विफ्ट/डिझायर/बलेनो
मारुती स्विफ्ट/डीझायर/बलेनो या गाड्यांमध्ये 1.2L 4-सिलेंडर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन दिले आहे, जे 89bhp आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. स्विफ्ट आणि डिझायरला मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्स ऑप्शन्स मिळतात, तर बलेनोला मॅन्युअल आणि सीव्हीटी ऑटोमॅटिक गिअरबॉक्स ऑप्शन दिले आहेत.या तिघांच्या फीचर्सबद्दल बोलायचे तर त्यांची देखभाल करणे सोपे आहे. चांगल्या इंजिन परफॉर्मंससह, या कार चांगले मायलेज देतात. मात्र या ग्लोबल NCAP/लॅटिन NCAP क्रॅश टेस्टमध्ये फेल ठरल्या आहेत.
HYUNDAI GRAND I10 NIOS
हे देशातील सर्वाधिक विकली जाणार्या हॅचबॅकपैकी एक आहे. यामध्ये 2 इंजिन ऑप्शन्स दिले आहेत, 1.2-लीटर नॅच्युरली-एस्पिरेटेड पेट्रोल आणि 1.0-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल. ते रु. 5.28 लाख ते रु. 8.50 लाख किंमतीच्या ब्रॅकेटमध्ये येते. चांगल्या इंजिन परफॉर्मंन्ससह, त्याचे मेंटेन्स करणे देखील सोपे आहे. त्याचा नकारात्मक मुद्दा म्हणजे ग्लोबल एनसीएपी फेल होणे. तसेच कारचे मायलेज सुधारता आले असते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.