Budget Car : 5 लाखापेक्षा कमी किमतीत येतील या दोन कार, मात्र कोणती कार तुमच्यासाठी बेस्ट? वाचा

या दोन कारपैकी बजेटमधे बसणारी आणि तुमच्यासाठी बेस्ट ठरणारी कार कोणती ते जाणून घ्या
Budget Car
Budget Caresakal
Updated on

Budget Car : देशात सध्या कारची विक्री शिखरावर असून वेगवेगळ्या प्रकारच्या कार भन्नाट फिचरसह उपलब्ध आहेत. तेव्हा अगदी कमी बेजटमधे कार घेण्याचा प्रयत्न करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. या कार अगदी पाच लाखांच्या आत तुम्हाला मिळतील. तेव्हा या दोन कारपैकी बजेटमधे बसणारी आणि तुमच्यासाठी बेस्ट ठरणारी कार कोणती ते जाणून घ्या.

पाच लाखांच्या आतील बजेटमधे तुमच्यासाठी दोन कार ऑप्शन्स उपलब्ध आहेत. या किंमतीमध्ये तुम्हाला दोन प्रकारच्या कार मिळतील. यामध्ये मारुती  सुझुकी ऑल्टो के 10 (Maruti Alto k10) रेनॉल्ट क्विड (Renault Kwid) यांचा समावेश आहे. या गाड्यांबद्दल माहिती जाणून घेऊया.

गाड्यांच्या किंमतीची तुलना

कार खेरदी करताना सर्वात आधी बजेटचा विचार केला जातो. यासोबत गाड्यांच्या एकापेक्षा जास्त ऑप्शनचा शोध घेतला जातो. त्यामुळे कार खरेदी करताना त्यांच्यातील फीचर्समधील फरक कळण्यास मदत होते. अशातच मारुती सुझुकी ऑल्टो के 10 ही कार एसटीडी(ओ), एलएक्सआय, व्हीएक्सआय आणि व्हीएक्सआय प्लस यासारख्या चार सेगमेंटमध्ये उपलब्ध असणार आहे. तसेच या गाड्यांची एक्स शो रुम प्राईझ 3.99 लाख रु. ते 5.95 लाख रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध आहे

तर दुसरीकडे रेनॉल्ट क्विडच्या गाड्यांमध्ये आरएक्सई, आरएक्सएल, आरएक्सएल(ओ) आणि क्लाईंबरसारखे पाच सेगमेंट उपलब्ध असून कारची एक्स शो रुम प्राईझ 4.70 लाख रुपये ते 6.33 लाख रुपये या रेंजमध्ये उपलब्ध असणार आहे. 

Budget Car
Maruti Suzuki : 40 km चा मायलेज अन् खूप काही... Maruti Swift आणि Dzire चे नवीन अवतार बघितले का?

दोन्ही गाड्यांच्या फीचर्सवर नजर

ऑल्टो के10 मध्ये अॅपल कार प्ले आणि अँड्रॉईड ऑटोसह उपलब्ध आहे. यासोबत 7 इंचचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, की-लेस एन्ट्री आणि एक डिजिटलाईज्ड इंस्ट्रूमेंट क्लस्टर, स्टिअरिंग-माऊटेड कंट्रोल यासारखे फीचर्स आहे. या कारमध्ये चालक-प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ड्युएल एअरबॅग, ईबीडीसोबत एबीएस आणि रिअर पार्किंग सेंसरसारख्या सेफ्टी फिचर्स आहेत. (Automobile)

Budget Car
Budget Friendly Cars : बजेट फिट अन् फिचर्स हिट, आणखी काय हवं? मार्केटमधील 5 स्वस्त CNG Cars

या रंगांमधे या कार उपलब्ध

मारुतीने ऑल्टो के 10 हॅचबॅक सहा मोनोटोनच्या शेड्समध्ये उपलब्ध करुन दिली आहे. यामध्ये मेटॅलिक सिजलिंग रेड, मेटॅलिक सिल्की सिल्वर, मेटॅलिक ग्रॅनाइट ग्रे, मेटॅलिक स्पीडी ब्लू, प्रीमियम अर्थ गोल्ड आणि सॉलिड व्हाईट या रंगांचे पर्याय गाडीमध्ये उपलब्ध करुन दिलेले आहेत. त्यामुळे ज्यांना स्वस्तात बेस्ट कार घ्यायची असेल तर हे ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. त्यांच्यासाठी या कार बजेटमधील आणि चांगला ऑप्शन ठरु शकतात.

तर रेनॉल्ट क्विड, सीक्स मोनोटोन आणि दोन ड्यूएल-टोन शेड्समध्ये उपलब्ध आहे. यामध्ये आईस कूल व्हाईट, मेटल मस्टर्ड, फायरी रेड, आऊटबॅक ब्रॉन्ज, मूनलाइट सिल्वर, जांस्कर ब्लू, ब्लॅक रुफसह आईस कूल व्हाईट आणि ब्लॅक रुफसह मेटल मस्टर्डचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()