Car Buying Decision: बजेट अन् गरज ओळखून तुमच्यासाठी परफेक्ट कार कशी निवडाल? या टिप्स करतील मदत!

How to Choose the Right Car for You: कमी पैशात कार घ्यायची आहे तर मग एकमेव पर्याय आहे, कोणता ते क्लिक करून वाचा
Car Buying Decision
Car Buying Decisionesakal
Updated on

Car Buying Decision: एखादी छोटी हेअर क्लिप खरेदी करताना आपण अनेकदा ती टिकेल की नाही याचा विचार करतो. पण, कार खरेदी करताना इतका बारकाईने विचार करतो का? तर नाही. त्यामूळेच अनेकदा नवी कोरी कार दारात फक्त पडून असते. म्हणावा तसा तिचा वापर होत नाही.(How to Choose the Right Car for You)

तूम्हीही या वर्षी नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल. तर, तूम्हाला आमच्या टिप्सची गरज आहे. कार निवडण्यापूर्वी आणि घेण्यापूर्वी काही बारीकसारीक गोष्टींचा नेहमी विचार केला पाहिजे. कार खरेदी करण्याआधी आपण तिचा विचार करायला हवा. अन्यथा आपले नुकसानच होते.

त्यामूळेच कार खरेदी करताना किंवा इतर ठिकाणी तिची माहीती घेताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा, हे पाहुयात.

Car Buying Decision
Upcoming Cars : एप्रिल मध्ये लॉन्च होणार या पाच जबरदस्त कार्स

बजेट

जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर छोटी कार घ्या. लक्झरी स्पोर्ट्स कार व्यतिरिक्त, लहान कारची किंमत मोठ्या मॉडेलपेक्षा कमी असते. ते कमी इंधन देखील वापरतात, ज्यामुळे तुमचे दीर्घकालीन पैसे वाचतील.

जर तुमच्या लाईफ स्टाईलला सुट होणारी, परवडणारी कार असेल. तसेच, त्यात तुमचे कुटुंब आरामात प्रवास करू शकत असेल तर आकाराने छोटी कार निवडा.

कुटुंबातील सदस्य

जर तूमच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी असेल. किंवा भविष्यात तुम्ही फॅमिली प्लॅनिंग करणार असाल.तर चार डोअर असलेल्या छोट्या कारला पसंती द्या.

Car Buying Decision
Upcoming SUV Cars : ह्युंदाई क्रेटाला टक्कर द्यायला येणार या तीन नव्या SUV

मोठ्या कुटुंबासाठी गाडी निवडताना

तूमचे कुटुंब मोठे असेल तर मोठ्या आकाराची मिनीव्हॅन किंवा SUV चा विचार करा. जर तुम्ही नियमितपणे 4 किंवा अधिक लोक प्रवास करत असाल आणि ट्रंकसाठी भरपूर जागा हवी असेल. तर तुमच्या गरजेनुसार मोठे वाहन निवडा. एक मिनीव्हॅन किंवा SUV मध्ये आरामात 8 व्यक्ती प्रवास करू शकतात.

कारचा EMI

तुमची कार तूम्ही लोनवर घेणार असाल तर त्याचा EMI तुमच्या मासिक पगारापेक्षा जास्त नसावी. कारण पगार हा तुम्हाला तुमचे इतर मासिक खर्च, जसे की भाडे किंवा सामान, बिल आणि कार विमा हफ्ते भागवते. त्यामूळे कारचा EMI किती असावा याचा योग्य विचार करून कारची निवड करा.

Car Buying Decision
Car साठी नक्की काय योग्य? CNG की LPG

Second hand कार निवडा

नवीन आणि वापरलेली कार ठरवताना तुमचे बजेट किती आहे याचा विचार केला जातो. पण सेकंड हॅंड कार निवडणे फायद्याचे ठरते. त्यामूळे ती निवडताना कार योग्य अवस्थेत आहे का?  याची चाचणी घेऊन मगच जूनी कार घेण्याचा विचार करा.

इतर कारसोबत तुलना करा

एखादी कार निवडताना तिचे कार रिव्ह्यू तपासा. ही गोष्ट आता ऑनलाईनही उपलब्ध होते. त्यामूळे जी गाडी निवडणार आहात तिची वैशिष्ट्ये, परफॉर्मन्स आणि तिचे तोटे काय आहेत याचीही माहिती मिळेल.

Car Buying Decision
Electric Car खरेदी करण्याचा विचार करताय?आधी त्याचे फायदे तोटे जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.