Data Top-up Plan : एअरटेल, जिओ की व्ही.. आयपीएल पाहण्यासाठी कुणाकडे आहे बेस्ट डेटा प्लॅन?

Data Booster Plans : जिओ, एअरटेल आणि व्हीआय अशा तीन मोठ्या कंपन्यांनी खास आयपीएलसाठी विशेष प्लॅन्स लाँच केले आहेत. यापैकी तुमच्या गरजेनुसार तुम्ही प्लॅन घेऊ शकता.
Data Top-up Plan
Data Top-up PlaneSakal
Updated on

Airtel Vs Jio Vs VI : इंडियन प्रीमियर लीगच्या 17व्या सीझनला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (22 मार्च) या सीझनचा पहिला सामना पार पडला. जिओ सिनेमावर यंदाचं आयपीएल मोफत पाहता येतंय. मात्र, कित्येक जणांचा दैनंदिन डेटा संपल्यामुळे त्यांना कालचा सामना पूर्ण पाहता आला नाही. यामुळेच आम्ही तुम्हाला आयपीएल पाहण्यासाठी बेस्ट प्लॅन्स सांगणार आहोत.

जिओ, एअरटेल आणि व्हीआय अशा तीन मोठ्या कंपन्यांनी खास आयपीएलसाठी विशेष प्लॅन्स लाँच केले आहेत. यापैकी तुमच्या गरजेनुसार तुम्ही प्लॅन घेऊ शकता. या सर्व टॉपअप प्लॅन्ससाठी तुमच्याकडे एक बेस प्लॅन असणं गरजेचं आहे. (Best Data Ad-on Packs)

एअरटेलचा प्लॅन

एअरटेलने IPL च्या निमित्ताने एक नवीन टॉपअप प्लॅन लाँच केला आहे. क्रिकेट सीझन एक्सक्लुझिव्ह असं या पॅकचं नाव आहे. 39 रुपयांच्या या प्लॅनमध्ये एका दिवसासाठी अनलिमिटेड इंटरनेट डेटा मिळतो. यातील 20 GB डेटा हा FUP असेल. या प्लॅनची किंमत पूर्वी 49 रुपये होती. मात्र, आयपीएलच्या निमित्ताने यात सूट देण्यात आली आहे. (Airtel Data Top-up plans)

यासोबतच एअरटेलचा 29 रुपयांचाही एक प्लॅन आहे, ज्यामध्ये एका दिवसासाठी 2GB डेटा मिळतो. 19 रुपयांच्या डेटा अ‍ॅडऑन प्लॅनमध्ये एका दिवसासाठी 1GB डेटा मिळतो.

Data Top-up Plan
CSK vs RCB IPL 2024 : गतविजेत्या चेन्नईने केली धडाक्यात सुरूवात, आरसीबीची पाटी मात्र राहिली कोरी

जिओचे प्लॅन

जिओने आयपीएलच्या निमित्ताने दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. यातील पहिला प्लॅन 29 रुपयांचा आहे. यात 2.5 GB डेटा मिळतो. याची वैधता तुमच्या बेस प्लॅननुसार असेल. म्हणजेच तुमचा बेस प्लॅन जोपर्यंत व्हॅलिड आहे, तोपर्यंत तुम्ही हा 2.5GB डेटा वापरु शकता. जिओच्या दुसऱ्या नवीन प्लॅनमध्ये 222 रुपयांमध्ये 50GB डेटा मिळणार आहे. याची वैधता देखील तुमच्या बेस प्लॅनप्रमाणे असेल. जिओच्या क्रिकेट ऑफर डेटा पॅकमध्ये 49 रुपयांना 25GB डेटा मिळणार आहे. मात्र, याची वैधता केवळ एक दिवस असेल. (Jio Data Packs)

जिओचे डेटा अ‍ॅडऑन प्लॅन्स

  • 15 रुपये - 1GB डेटा (वैधता - बेस पॅक)

  • 25 रुपये - 2GB डेटा (वैधता - बेस पॅक)

  • 61 रुपये - 6GB डेटा (वैधता - बेस पॅक)

वोडाफोन-आयडियाचे प्लॅन्स

वोडाफोन-आयडिया, म्हणजेच 'व्ही'ने देखील आयपीएलच्या निमित्ताने खाल प्लॅन लाँच केले आहेत. व्हीच्या 359 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. म्हणजेच एका दिवसाला साधारपणे 13 रुपयांमध्ये यूजर्सना 3GB डेटा मिळेल. यासोबतच या प्लॅनमध्ये बिंज ऑल नाईट, व्ही मूव्हीज अँड टीव्ही, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डीलाईट्स या सुविधा मिळतात. (VI Data Packs)

व्हीचे डेटा अ‍ॅडऑन प्लॅन्स

  • 49 रुपये - 6GB डेटा (वैधता - 24 तास)

  • 39 रुपये - 3GB डेटा (वैधता - 3 दिवस)

  • 29 रुपये - 2GB डेटा (वैधता 2 दिवस)

  • 19 रुपये - 1GB डेटा (वैधता 1 दिवस)

Data Top-up Plan
CSK vs RCB IPL 2024 : मुस्तफिजूरचं मॅजिक अन् रचिनचा धडाका; ऋतुराजच्या कॅप्टन्सीचा विजयी श्रीगणेशा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.