Best Earbuds Under 2000: सध्या ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येणाऱ्या इयरबड्सला यूजर्सची मोठी पसंती मिळत आहे. वायर्ड इयरफोनऐवजी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येणारे इयरबड्स हे दिसायला स्टाइलिश आणि वापरण्यास सोपे असतात. बाजारात खूपच कमी किंमतीत येणारे शानदार इयरबड्स उपलब्ध आहेत. १५०० रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या अशाच शानदार इयरबड्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
pTron Bassbuds Nyx
pTron Bassbuds Nyx ची मूळ किंमत ३,९९९ रुपये आहे. परंतु, ६८ टक्के डिस्काउंटनंतर फक्त १,२९९ रुपयात खरेदी करू शकता. सिंगल चार्जमध्ये या बड्सला ३२ तास वापरू शकता. यामध्ये १०एमएमचे डायनॅमिक ड्राइव्हर देण्यात आले आहे. आवाज स्पष्ट यावा यासाठी हायसेंसेटिव्ह माइक दिले आहेत. यात मूव्ही मोडसह टच सेंसर देखील मिळतो. वॉइस असिस्टेंटचा देखील सपोर्ट दिला आहे. तसेच, वॉटर रेसिस्टेंटसाठी आयपीएक्स४ रेटिंग मिळाले आहे.
हे ही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....
URBN Beat 600
URBN च्या या बड्सची मूळ किंमत २,९९९ रुपये आहे. परंतु, डिस्काउंटनंतर फक्त १,२९९ रुपयात खरेदी करण्याची संधी आहे. यात वॉइस असिस्टेंट फीचर देखील मिळते. बड्समध्ये १३एमएमचे ड्राइव्हर दिले आहेत. कॉलवर बोलण्यासाठी यात मायक्रोफोनसह क्लिअर कॉल टेक्नोलॉजीचा सपोर्ट मिळतो. बड्स २० तासांच्या ऑडिओ प्लेबॅकसह येतात. १० मिनिटांच्या चार्जमध्ये तुम्ही १०० मिनिटं याचा वापर करू शकता.
Blaupunkt BTW20
काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या Blaupunkt BTW20 बड्सला १,३९९ रुपयात खरेदी करता येईल. याची मूळ किंमत ३,२९९ रुपये आहे. बड्सला ब्लू, ग्रीन, ब्लॅक आणि व्हाइट रंगात खरेदी करता येईल. गाणी ऐकताना शानदार अनुभव मिळावा यासाठी १०एमएमचे ड्राइव्हर दिले आहेत. याशिवाय, स्मार्ट टच कंट्रोल, वॉइस असिस्टेंट सारखे फीचर्स देखील यात मिळतात. एकदा चार्ज केल्यावर बड्सला ३० तास वापरू शकता. हे बड्स एलईडी डिस्प्लेसह येतात. यावर तुम्हाला बॅटरी किती टक्के चार्ज झाली आहे, याची माहिती मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.